एक्स्प्लोर
नाभिक समाज आक्रमक, 11,000 जण मुंडन करुन केस मुख्यमंत्र्यांना देणार
उद्यापासून मुख्यमंत्री ज्या ज्या कार्यक्रमात जातील, तिथे तिथे नाभिक समजाकडून काळे झेंडे दाखवले जाणार आहेत.
बुलडाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाविषयी काढलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर नाभिक संघटनांनी वेगवेगळ्या प्रकारे निषेध केला होता. मात्र आता महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली.
नाभिक महामंडळाची बैठकीत काय निर्णय झाला?
राज्यस्तरीय नाभिक महामंडळाची देऊळगाव राजा येथे बैठक पार पडली. नाभिक समाज 2 डिसेंबर रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. तर हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे 13 डिसेंबर रोजी 11 हजार जण मुंडन करुन, केस मुख्यमंत्र्यांना भेट देणार आहेत.
त्याचबरोबर, उद्यापासून मुख्यमंत्री ज्या ज्या कार्यक्रमात जातील, तिथे तिथे नाभिक समजाकडून काळे झेंडे दाखवले जाणार आहेत.
प्रकरण काय आहे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 नोव्हेंबर रोजी पाटस येथील साखर कारखान्याच्या उद्घघाटनावेळी नाभिक समाजावरुन वक्तव्य केलं होतं. आघाडी सरकारच्या काळातील सिंचन योजनांवर खर्च केलेल्या पैशांवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यासाठी त्यांनी नाभिकाचं उदाहरण दिलं होतं.
दरम्यान, यावरुन मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे नाभिक महामंडळाची माफी मागितली आहे. तसेच आपल्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यावर दिलगिरी व्यक्त करत असल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement