N. D. Patil : शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यावर आज दुपारी कोल्हापुरात होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, शरद पवारांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात ठेवण्यात आले आहे.
N. D. Patil : महाराष्ट्राच्या पुरोगामी, डाव्या चळवळीतील अग्रणी आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
ज्येष्ठ नेते विचारवंत प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांचे काल निधन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. याबरोबरच एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ देखील छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात उपस्थित आहेत.
आज दुपारी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या एन. डी. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शाहू कॉलेजच्या पटांगणारवर ठेवण्यात आले आहे. दुपारी एक वाजेपर्यंत शाहू कॉलेज येथे त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून फक्त 20 लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. एन. डी. पाटील यांनी आयुष्यभर कष्टकरी, शेतकरी, आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरची लढाई लढली. विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
महत्वाच्या बातम्या
- "महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
- N. D. Patil : एनडींनी घोषणा दिली, टोलची खोकी पंचगंगेत बुडवू, जे देशात कुणालाही जमलं नाही ते एन डींनी करुन दाखवलं!
- मी आत्याला मस्करीत म्हणायचे, एन डी मामांबरोबर संसार करतेस, तुला अॅवॉर्डच द्यायला हवा : सुप्रिया सुळे
- N D Patil : रचनात्मक लढाईचा निर्माता, सीमा लढ्याचा नेता, सेझ लढ्याचा कॅप्टन, एन. डी पाटलांची धगधगती कारकीर्द