एक्स्प्लोर
Advertisement
पालिकेतील कामगारांचे वेतन वेळेत न दिल्यास कायदेशीर कारवाई
मुंबई : किमान वेतन अधिनियमांतर्गत पालिकेतील कामगारांचे किमान वेतन न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी स्पष्ट केलं आहे. कामगार विभागाकडून यापूर्वीच संबंधित महानगरपालिकांना ईमेलद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत आज संध्याकाळपर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मुंबई, नाशिक आणि ठाणे महानगर पालिकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 8,000 इतकी आहे. तीनही महानगरपालिकांनी आपापल्या सफाई कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन दयावं, जर ते देण्यास उशीर झाला तर त्या महानगरपालिकेवर कडक कारवाई केली जाईल अशी भूमिका कामगार मंत्री श्री. पाटील-निलंगेकर यांनी मांडली आहे.
दरम्यान नाशिक महानगर पालिकेने कामगारांचे वेतन आणि थकबाकी उद्यापर्यंत देण्यात येईल असं स्पष्ट केले आहे. दोन महिन्यापूर्वी कामगार मंत्र्यांची कामगार संघटनेबरोबर झालेल्या समन्वय बैठकीत कामगारांच्या वेतनविषयक निर्णय घेण्याचे संकेत दिले होते.
नवी मुंबई महानगरपालिकेकडून समान काम समान वेतन मिळत नसल्याने सफाई कामगारांकडून आज संप पुकारण्यात आला होता. 5500 हजार कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचले होते. तसंच हॉस्पिटल मधील सफाई कामगारांकडूनही संप पुकारण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement