महत्वाची बातमी! मुंबई-ठाण्यात पाणी कपात, कोल्हापुरातही दोन दिवस पाणीपुरवठा बंद
Water Cut : मुंबईतील काही भागांत पाणीकपात होणार आहे. तर ठाण्यात आज सकाळी 9.00 ते शनिवारी सकाळी 9.00 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे.
BMC, TMC, kolhapur Water Cut : मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर शहरात पाणी कपात होणार आहे. मुंबईतील काही भागांत 26 आणि 27 तारखेला पाणीकपात होणार आहे. तर ठाण्यात आज सकाळी 9.00 ते शनिवारी सकाळी 9.00 वाजेपर्यंत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. याशिवाय कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा रविवार आणि सोमवारी बंद राहणार आहे.
मुंबई 15 टक्के पाणीकपात -
- मंगळवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० ते बुधवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ सकाळी १० वाजेपर्यंत एस, के/पूर्व, एच/पूर्व आणि जी/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहरास पाणीपुरवठा करणाऱया भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रात दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलण्याचे काम तसेच पिसे-पांजरापूर संकुलातील तृतीय टप्प्याच्या उदंचन केंद्रातील एक नादुरुस्त उदंचन संच काढून त्या ठिकाणी राखीव उदंचन संच बसविण्याचे काम मंगळवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कारणाने, सदर कालावधीत मुंबई महानगरातील पूर्व व पश्चिम उपनगरे आणि शहर विभागातील सर्व भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन सुमारे १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
याशिवाय, पवई येथे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व तानसा पश्चिम जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे काम मंगळवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० पर्यंत हाती घेण्यात येणार आहे.
या कालावधीत म्हणजे, मंगळवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० पर्यंत के/पूर्व, एस, जी/उत्तर व एच/पूर्व या विभागांमधील खालील नमूद परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
१) एस विभाग - फिल्टरपाडा एस एक्स – ०६ - (२४ तास) - जयभिम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि परिसर, फिल्टरपाडा
२) के/पूर्व विभाग - मरोळ बस बार क्षेत्र, केई ०१ - (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजता) - चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर
३) के/पूर्व विभाग - सहार रोड क्षेत्र, केई ०१ - (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजता) - कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍण्ड टी वसाहत
४) के/पूर्व विभाग - ओम नगर क्षेत्र, केई ०२ – (पहाटे ४ ते सकाळी ८ वाजता) - ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतार पाखडी (पाईपलाईन क्षेत्र)
५) के/पूर्व विभाग - एम. आय. डी. सी. व भवानी नगर केई १० - (सकाळी ११ ते दुपारी २ वाजता) - मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, भंगारवाडी, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज
६) के/पूर्व विभाग – विजय नगर मरोळ क्षेत्र, केई - १०ए - (सायंकाळी ६ ते रात्री १०.०० वाजता) - विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओआसिस, गांवदेवी, मरोळ गांव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा
७) के/पूर्व विभाग – सिप्झ (२४ तास) तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ (२४ तास)
८) एच/पूर्व विभाग - बांद्रा टर्मिनल पुरवठा क्षेत्र
९) जी / उत्तर विभाग - धारावी सायंकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र - (दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत) - धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग
१०) जी / उत्तर विभाग - धारावी सकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत) - प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फीट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग
आज ठाण्यात पाणी नाही
ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील राँ वाँटर पंपिग स्टेशन मध्ये वाढीव क्षमतेचे पंपिग मशीन बसविण्याचे काम चालू असून सदर प्रकल्पातील दुसरा पंप चालू करणे व त्या अनुषंगाने इतर कामे करण्यात येणार आहेत. यासाठी मे. स्टेम प्राधिकरणाने देखभाल दुरूस्ती तसेच महत्वाच्या कामाकरिता शुक्रवारी 22/10/2021 रोजी सकाळी 9.00 ते शनिवारी सकाळी 9.00 वाजेपर्यंत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे शहराचा पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे. सदर दिवशी घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट,समतानगर, आकृती, सिध्देश्वर, जेल, जाँन्सन, इटरनिटी, ब्रह्मांड, विजयनगरी, बाळकूम, कोलशेत, आझादनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, साकेत, रूस्तमजी इ. भागात तसेच कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणीपुरवठा 24 तासासाठी बंद राहणार आहे. वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद
कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा येत्या रविवारी आणि सोमवारी बंद राहणार आहे...शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्याला गेल्या काही दिवसापूर्वी गळती लागली आहे....हे गळती काढण्याचे काम महानगरपालिकेकडून हाती घेतलं जाणार आहे.. त्यामुळे शिंगणापूर उपसा केंद्र देखील बंद ठेवावं लागणार आहे....परिणामी रविवार आणि सोमवार हे दोन दिवस ए,बी,सी, डी आणि ई वॉर्डातील पाणी पुरवठा खंडित होणार आहे... त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केलंय....