एक्स्प्लोर

मध्य प्रदेशातील राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रातही 'ऑपरेशन लोटस'?

मध्य प्रदेशात 'ऑपरेशन लोटस'चा प्रयोग सुरु झाला आणि इकडे महाराष्ट्रातही त्याची जोरदार चर्चा सुरु झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य तर मग महाराष्ट्रात कोण? मध्य प्रदेशात 15 महिन्यानंतर तर मग महाराष्ट्रात कुठली वेळ? मध्य प्रदेशात होळीचा मुहूर्त तर महाराष्ट्रात कुठला?

मुंबई : मध्य प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपानंतर कमलनाथ सरकार किती दिवस तग धरणार याबाबत अटकळ बांधली जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपमध्ये सामील झाले. यानंतर मध्य प्रदेशात राजकीय भूकंप आला आणि त्याचे धक्के शेजारच्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रातही जाणवत आहेत. मध्य प्रदेशात ऑपरेशन कमलचा प्रयोग सुरु झाला आणि इकडे महाराष्ट्रातही त्याची जोरदार चर्चा सुरु झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे तर मग महाराष्ट्रात कोण? मध्य प्रदेशात 15 महिन्यानंतर तर मग महाराष्ट्रात कुठली वेळ? मध्य प्रदेशात होळीचा मुहूर्त तर महाराष्ट्रात कुठला? असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत. महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या. पण मध्य प्रदेशात काँग्रेस 115 जागांसह नंबर एकवर तर 105 जागांसह भाजप दुसऱ्या नंबरवर अशी स्थिती होती. त्यामुळेच सुरुवातीला भाजपने सत्तास्थापनेचा दावाही केला नाही, भाजप शांत राहिली. पण महाराष्ट्रात नंबर एकवर असलेल्या भाजपने शिवसेना सोबत येत नाही म्हटल्यावर अजित पवारांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण तो अवघ्या 40 तासांमध्येच फसला. त्यामुळे आता दुसरा प्रयोग करण्याचं धाडस करण्याआधी भाजपला बरीच काळजीही घ्यावी लागेल. Jyotiraditya Scindia | ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश मध्य प्रदेशातल्या पुनरागमनासाठी भाजपने शिवराजसिंह चौहान यांना राखून ठेवलं. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळ किंवा संघटनेतही कुठलं पद दिलं नाही. महाराष्ट्रातही अधूनमधून देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत जाण्याची आवई उठते. पण तूर्तास तरी शक्यता दिसत नाही. मध्य प्रदेश जितकं महत्त्वाचं आहे त्याहून राजकीय, आर्थिकदृष्टया महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य आहे. अर्थात मध्य प्रदेशात केवळ भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होती. पण महाराष्ट्रात तीन पक्षांचं एकत्रित सरकार आहे. भाजपसोबत जाण्यासाठी दोन शक्यता उरतात. एक तर या तीन पक्षातल्या कोणाला 25 आमदारांचा गट फोडून जावं लागेल किंवा सरळ या तीनपैकी एक पक्षच भाजपसोबत यावा लागेल. लवकरच महाराष्ट्र विकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस आणि शिवसेनेचं महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे. मात्र भाजपचं ऑपरेशन लोटस सक्रिय होणार नाही ना, याची चिंता आता महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला आहे. मध्य प्रदेशातीस राजकीय संकट पाहता, उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर आहेत. मध्य प्रदेशातील राजकीय चित्र पाहता, महाराष्ट्र विकास आघाडी लवकरच समन्वय समितीची बैठक बोलावणार आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकारवर कोणतंही राजकीय संकट ओढावू नये, यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार वादग्रस्त मुद्दे लांबणीवर टाकण्याचा विचार करत आहे. मुस्लीम आरक्षण, सीएए, एनआरसी यांसारख्या इतर मुद्द्यांवर तिन्ही पक्षांमध्ये वाद आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रे या तिन्ही पक्षांमध्ये सातत्याने समन्वय समितीमध्ये बातचीत होईल. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार धोक्यात, ज्योतिरादित्य शिंदेंसह काँग्रेसच्या 22 आमदारांचा राजीनामा लोकसभा निवडणुकीआधी भाजपने तीन राज्यं गमावली. लोकसभेनंतर महाराष्ट्र गमावलं, झारखंडमध्ये पराभव झाला, दिल्लीतही हार, या सगळ्या मालिकेला आता मध्यप्रदेशच्या या खेळीने ब्रेक मिळतो का हे पाहावं लागेल. Operation Lotus in Maharashtra | भाजप मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार का?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Beed Loksabha Pankaja Munde : बाबांची उर्जा आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे : पंकजा मुंडेParli Lok Sabha Dhananjay Munde : छोट्या बहिणीला मतदान करताना जो आनंद झालाय तो शब्दात मांडण अशक्यUddhav Thackeray Lok Sabha :   निवडणूक महाभारतासारखी, लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय : उद्धव ठाकरेABP Majha Headlines : 12 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Embed widget