Mothers Day : मायलेकीचं प्रेम! आईवर लिहिले तब्बल 28 काव्यसंग्रह; देव्हाऱ्यात पूजनासाठी ठेवली आईची चप्पल
Mothers Day Buldhana Story : मायलेकीच्या प्रेमाच्या अनेक कथा आपण ऐकल्या असतील. अशीच एक भन्नाट कहाणी आहे बुलढाण्यातील या लेकीची.
Mothers Day : आईच्या उपकाराची परतफेड व आई प्रति प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे मातृदिन! दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जागतिक मातृदिन साजरा करण्यात येतो. मायलेकीच्या प्रेमाच्या अनेक कथा आपण ऐकल्या असतील. अशीच एक भन्नाट कहाणी आहे बुलढाण्यातील लेकीची. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कविता आटोळे या महिलेचं आपल्या आईवर इतकं प्रेम आहे की तिने आईवर एक दोन नव्हे तर चक्क 28 काव्यसंग्रह लिहून काढले. इतकंच नव्हे तर कविता यांनी आपल्या आईच्या चप्पल चक्क आपल्या देव्हाऱ्यात दररोजच्या पूजेसाठी ठेवल्या आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या कविता आटोळे या गृहिणी आहेत. त्यांचं शिक्षण SNDT विद्यापीठातून झालंय. कावितांचं आपल्या आईवर इतकं प्रेम आहे की आई देवाघरी गेल्यावर त्यांनी आपल्या आईची आठवण म्हणून चक्क आपल्या आईची चप्पल आपल्या देवघरात दररोजच्या पूजनासाठी ठेवली. कविता यांना आपल्या आईबद्दल इतकं प्रेम आहे की त्यांनी आई गेल्यावर आपल्या आईवर एक दोन नव्हे तर चक्क 28 काव्यसंग्रह लिहून काढले आहेत. त्यातील 21 काव्यसंग्रह हे प्रकाशित झाले असून अजून काही प्रकाशित व्हायचे आहेत.
पाच भावंडांपैकी कविता या सर्वात लहान. लहान असल्यामुळे आईची लाडकी. त्यामुळे एक सेकंद ही कविता यांना आई दूर जायला नको होती. काविता या आईबाबत भावना व्यक्त करताना म्हणतात की, जर आई नसती तर मी पण नसते. त्यामुळे आईपासून मी दूर जाऊ शकत नाही. प्रत्येक सेकंदाला त्या आईची आठवण करतात. आईबद्दल लिहीत असतात. यातूनच 28 काव्य संग्रहांचा उदय झाला. कविताचे भाऊ सुद्धा आपल्या लाडक्या लहान बहिणीचं या बाबतीत कौतुक करतात. जागतिक मातृदिनी अशा आई प्रेमी कविता यांच्या काव्यसंग्रहाला काव्यप्रेमी वाचकांकडून मोठी मागणी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Mother's Day Google Doodle 2022 : 'मदर्स डे'च्या निमित्तानं गुगलचं खास डूडल, आईच्या प्रेमाचा संदेश
Mothers Day 2022 : 'मदर्स डे' निमित्त आईबरोबर शेअर करा 'या' गोष्टी; नातं होईल अधिक घट्ट
Mothers Day Special : आई-मुलांच्या नात्यावर भाष्य करणारे 'हे' बॉलिवूड सिनेमे मातृदिनी नक्की पाहा