Mothers Day 2022 : 'मदर्स डे' निमित्त आईबरोबर शेअर करा 'या' गोष्टी; नातं होईल अधिक घट्ट
Mothers Day 2022 : आई आणि मुलीचं नातं हे मैत्रिणीसारखं असतं. आईने या गोष्टी आपल्या मुलीसोबत शेअर केल्या पाहिजेत. त्यामुळे नाते अधिक घट्ट होईल.
Mothers Day 2022 : आई आणि मुलीचं नातं खूप खास आहे. वयानुसार हे नातंही बदलतं. मुलगी लहान असताना आईचा मुलीवर असणारा प्रेमाचा वर्षाव आणि मुलगी वयात येताना आईचं मैत्रिणीत रूपांतर कसं होतं हे कळतंही नाही. मुलगी वयात येताना आई मुलीला काय चूक आणि काय बरोबर याचे सल्ले देते. आपली अपुरी राहिलेली स्वप्नं आई आपल्या मुलीच्या स्वप्नात पूर्ण करते. आईवर अनेक जबाबदाऱ्याही असतात. आपल्या मुलीला सुरक्षिततेबद्दल शिकवणे हे प्रत्येक आईचे कर्तव्य आहे. आणि प्रत्येक आई आपल्या मुलीला ही शिकवण देत असते. 8 मे रोजी म्हणजेच (उद्या) साजरा होणाऱ्या मदर्स डे (Mothers Day) निमित्त आई मुलीचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी काही खास गोष्टी तुमच्यासाठी...
आईने 'या' गोष्टी आपल्या मुलीसोबत शेअर कराव्यात :
1. आत्मविश्वास वाढवा - आईनेही आपल्या मुलीला तिच्यावर किती विश्वास आहे याची जाणीव करून दिली पाहिजे. मुलीला योग्य वळणावर साथ द्यायला हवी. अडचणींना खंबीरपणे तोंड द्यायला शिकवले पाहिजे. थोडक्यात आत्मविश्वास वाढवला पाहिजे. असे केल्याने तुमची मुलगी कधीही कमजोर होणार नाही.
2. सर्वकाही शेअर करा - मुली जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांच्यात अनेक शारीरिक बदल होतात. अशा परिस्थितीत आईने वेळोवेळी आपल्या मुलीला याबद्दल माहिती देत राहायला हवे. आईचे मुलीशी मैत्रिणीचे नाते असणं गरजेचं आहे. जेणेकरून मुलगी तुमच्याशी तिच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित कोणतीही गोष्ट अगदी मनमोकळेपणाने शेअर करेल. मनात संकोच येणार नाही. त्याचबरोबर मुलीला योग्य वेळी योग्य सल्ला देणेदेखील गरजेचे आहे.
3. योग्य-अयोग्यची ओळख सांगा - मुलींचे कॉलेज जीवनात अनेक मित्र-मैत्रिणी होतात. अशा वेळी आपले योग्य मित्र कोणते. खरे मित्र कोणते आणि ते कसे ओळखावे हे आईने आपल्या मुलीला सांगणे गरजेचे आहे. चुकीच्या लोकांशी असलेली मैत्री त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
4. सुरक्षेची जबाबदारी द्या - मुलगी मोठी झाल्यावर तिला स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी जाणवू द्या. मुलगी लहान असेपर्यंत तिला आई-वडील आणि भावांचे संरक्षण मिळते. पण शाळा-कॉलेजात जाताना तिने स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या मुलीला सांगा की तिची स्वतःची सुरक्षा ही तिची पहिली जबाबदारी आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी तुमच्या सुरक्षिततेचा नक्कीच विचार करा.
महत्वाच्या बातम्या :