Morning Headlines 15th April : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Rain Forecast : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
मुंबई : देशासह राज्यावर अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट कायम आहे. राज्यात काही भागात पुढील काही पावसाची शक्यता आहे. विदर्भ (Vidarbh), मराठवाड्यात (Marathawada) सलग पाच दिवस अवकाळी पावसानं (Rain Forecast) धुमशान घातलं आहे. आजही पावसाची शक्यता कायम आहे. राज्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम असून काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
ABP Cvoter Survey : कोणता पक्ष जनतेचे प्रश्न सोडवेल? भाजप आणि काँग्रेसपैकी कुणावर जास्त विश्वास, सर्वेक्षणात समोर आली धक्कादायक माहिती
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील इंडिया आघाडी (INDIA Alliance) असं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपसोबत एनडीए (NDA) आघाडीतील सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात जोर लावला आहे. दुसरीकडे काँग्रेसही रिंगणात उतरली असून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडूनही जोरदार प्रचार सुरु आहे. देशात पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलपासून सुरू होणार असून 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी कोणता पक्ष कोणता पक्ष बाजी मारणार याबाबत विविध शक्यता वर्तवल्यात जात आहेत. वाचा सविस्तर...
मोदी सत्तेत आल्यावर विधानसभेवर परिणाम होणार, 4 जूननंतर इच्छुकांसाठी आमची दारं उघडी: प्रफुल पटेल
नागपूर : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी मोठे गौप्यस्फोट केलेत.भाजपने आमच्याशी चर्चा करून ठरवलं होतं की एक महिना राष्ट्रपती शासन लागल्यानंतर आपण एकत्रित येऊ आणि सरकार स्थापन करू असा गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी केलाय. तर एकदा मोदी प्रचंड बहुमताने देशाचे सत्तेवर पुन्हा आल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर होणारच आहे. त्यावेळी पाहू कोण आमच्या सोबत यायला तयार होतं, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी व्यक्त केलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते. वाचा सविस्तर...
Water crisis: राज्यातील पाणीसंकट अधिक गडद, मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठ्यात मोठी घट
State Water Crisis: राज्यातील पाणीसंकट (Water Crisis) अधिक गडद झालं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील (Marathwada) पाणीसाठ्यात मोठी घट झालीय. तर उत्तर महाराष्ट्रातही (North Maharashta) पाण्याची पातळी घटली असून धरणांमधील पाणीसाठा कमी झालाय. तर कोकण आणि विदर्भातील परिस्थिती तुलनेने बरी आहे. तर राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे. मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यात (Marathwada) देखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याची टंचाई आणि दुष्काळाच्या झळा यामुळे बळीराजा मात्र हतबल झालाय. वाचा सविस्तर...
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले, एमएस धोनीने धू धू धुतले; इरफान पाठणने चांगलेच सुनावले!
CSK vs MI IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. आयपीएल 2024 च्या 29 व्या सामन्यात रविवारी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 206 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 186 धावा करू शकला. मुंबईकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावले. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात रोहित अपयशी ठरला. वाचा सविस्तर...
Horoscope Today 15 April 2024 : आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशींसाठी खास, नोकरीत पदोन्नतीसह मिळतील अनेक संधी; वाचा सोमवारचे राशीभविष्य
Horoscope Today 15 April 2024 : पंचांगानुसार, आज 15 एप्रिल 2024, आठवड्यातला पहिला दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...