एक्स्प्लोर
मिरज बलात्कार प्रकरण : पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्केंचं निलंबन
मिरज: मिरज बलात्काराप्रकरणी दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्के यांचं निलंबन करण्यात आलं आहे. मिरजच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुवर्णा पत्के यांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतरही आरोपीवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला जातो आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अमित कुरणेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. अमितसोबतच त्याच्या आईवडिलांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
मिरज पोलीस आज अमित कुरणेला कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी गर्दी करत अमितला चोप दिला. शिवाय अमितला व्हिआयपी ट्रिटमेंट देऊ नका असं म्हणत त्याला महिलांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली.
संबंधित बातम्या:
मिरज बलात्कार प्रकरण : आरोपी अमित कुरणेला मारहाण
मिरज बलात्कार प्रकरण : आरोपी अमित कुरणे अटकेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement