एक्स्प्लोर

कोल्हापूर अपघात: चालकावर मद्यपानाचा संशय

चालकाने मद्यपान केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, दगडी कठडा तोडून बस थेट नदीत कोसळली.

कोल्हापूर: पंचगंगा नदीत 100 फुटावरुन मिनी बस कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धक्कादायक म्हणजे चालकाने मद्यपान केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, दगडी कठडा तोडून बस थेट नदीत कोसळली. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात पुण्यातील बालेवाडी इथं राहणाऱ्या केदारी, वरखडे आणि नांगरे कुटुंबीयांवर काळाने झडप घातली. 7 वर्षानंतर मुलगा झाल्यानं एकूण 15 जण कोकणात नवस फेडण्यासाठी गेले होते.  तिथून परतत असताना हा अपघात घडला. बस शंभर फुटांवरुन पंचगंगेत कोसळली बालेवाडी आणि पिरंगुटे परिसरात राहणारे भरत केदारी , संतोष वरखडे , दिनेश नांगरे यांचं कुटुंबीय सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाला गेले होते. 26 जानेवारी निमित्ताने सलग सुट्ट्या लागल्याने कुटुंबाने देवदर्शन आणि पिकनिक नियोजित केली होती. त्यांनी कोकण पर्यटनासाठी 17 सीटर मिनी ट्रॅव्हलरमधून प्रवास सुरु केला. शुक्रवारी सकाळी या सर्वांनी गणपतीपुळे इथून देवदर्शन आटोपून कोल्हापूरकडे निघाले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास, शिवाजी पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने, मिनी ट्रॅव्हल्स पुलाचा दगडी कठडा तोडून वरुन थेट 100 फूट खोल असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रात कोसळली. गाडी कोसळल्याचा आवाज एकूण त्याच परिसरातील तरुणांनी बचावकार्य सुरु केलं. ही माहिती आपत्ती व्यवस्थापनाला समजल्यावर पोलीस,फायरब्रिगेड, घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. सुरुवातीला पाण्यात बुडालेल्या गाडीतील 7 जणांना काढण्यात यश आलं. परंतु तासभर प्रयत्न करुन देखील मिनीबस गाळातच रुतून बसल्यामुळे गाडीतील इतर प्रवाशांना बाहेर काढता आलं नाही. क्रेनने बस बाहेर काढली अखेर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त मिनी बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली आणि गाडीतील उर्वरित 7 जणांना बाहेर काढण्यात आले. एकूण गाडीत 17 प्रवासी होते यातील 13 मृतदेह काढण्यात आलेत तर तिघा जखमींवर सीपीआर रुगणालायात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर पोलीस, फायरब्रिगेड, समाजसेवी संस्था आणि कोल्हापुरातील तरुणांच्या संयुक्त प्रयत्नातून सुमारे 4 तास रेस्क्यू ऑपरेशन केलं.  मिनी ट्रॅव्हल्सच्या अपघातात 11 जण ठार झाले असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्यापही पंचगंगा नदी पात्रात मृतदेहाचा शोध सुरू आहे. अपघात झाल्याचं समजताच पंचगंगा नदी घाटावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. घटनास्थळी  पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी भेट देऊन पाहणी केली आहेत. अपघाताची वेळ ते बचावकार्य रात्री ११.३० वा. गणपतीपुळेहून बस कोल्हापूरकडे आली. रात्री ११.३५ च्या सुमारास बस शिवाजी पुलावरुन पंचगंगा नदीत कोसळल्याचा अंदाज रात्री ११.४० वा. जुना बुधवार तालीम मंडळाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल रात्री ११.४५ परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन तातडीनं बचावकार्याला प्रारंभ रात्री ११.५० पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल, बचावकार्याला वेग रात्री १२.०० दोन जखमींना बाहेर काढण्यात यश रात्री १२.३० पहिले सहा मृतदेह स्थानिक तरुणांनी बाहेर काढले रात्री १२.४५ अपुरा प्रकाश आणि तज्ज्ञ मनुष्यबळाच्या अभामुळे बचावकार्यात अडथळे रात्री १.३० वा. आणखी चार मृतदेह बाहेर काढण्यात यश रात्री २.०० वा. घटनास्थळी क्रेन दाखल पहाटे. ३.३५ वा. दीड तासांच्या अथक प्रयत्नांनकर बस तलावातून काढण्यात आली, बसमध्ये आणखी  मृतदेह सापडला. पहाटे. ५.४५ वा.  अंदाजे ६ महिन्याच्या बाळाचा मृतदेह तलावातून काढण्यात आला. सकाळी ७.०० – नदीतून मृतदेह काढण्याचे काम थांबवले बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात वारंवार अडथळे मृतांची नावे
  1. गौरी वरखडे (वय 16)
  2. ज्ञानेश्वरी वरखडे (वय 14)
  3. संतोष वरखडे (वय 45)
  4. साहील केदारी (वय 14)
  5. निलम केदारी (वय 28)
  6. भावना केदारी (वय 35)
  7. सचिन केदारी (वय 34)
  8. संस्कृती केदारी (वय 8)
  9. श्रावणी केदारी (वय 11)
  10. सानिध्य केदारी (10 महिन्यांचं बाळ)
  11. प्रतिक नांगरे (वय 14)
  12. छाया नांगरे (वय 41)
  13. बसचालक (वय 28)
जखमी व्यक्तींची नावे
  1. प्राजक्ता दिनेश नांगरे (वय 18)
  2. मनिषा संतोष वरखडे (वय 38)
  3. मंदा भरत केदारी (वय 54)
संबंधित बातमी 100 फुटांवरुन मिनी बस पंचगंगेत कोसळली, 13 ठार  PHOTO: कोल्हापुरात मिनीबस नदीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Tapase NCP :  आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतीलBJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Embed widget