एक्स्प्लोर
Advertisement
'मराठी बोला चळवळी'चा दणका, नेरुळ रेल्वे स्थानकाचं मुख्य नाव मराठीत
नवी मुंबई : मराठीच्या नावाने मतं मागणाऱ्या पक्षांना जे शक्य झालं नाही, ते 'मराठी बोला चळवळ' या मराठी तरुणांच्या संघटनेने करुन दाखवलं आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील नेरुळ रेल्वेस्थानकाच्या फलकांवरील मुख्य नाव 'नेरुल' असे होते. याला आक्षेप घेत मराठी बोला चळवळीचे कार्यकर्ते स्वप्नील बाम्हणे यांनी संबंधित रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि रेल्वे स्थानकावरील फलकांवर मुख्य नाव 'नेरुळ' असे मराठी भाषेत करुन रेल्वे प्रशासनाला एकप्रकारे दणकाच दिला.
प्रकरण काय आहे?
2 जून 2016 रोजी मराठी बोला चळवळीने नेरुळ रेल्वे स्थानकाच्या फलकांवर मराठीत नावासाठीची मोहीम सुरु केली. नेरुळ रेल्वे स्थानकाच्या फलकावर मुख्य नाव 'नेरुल' असे हिंदीत भाषेत होते. ते पाहून स्वप्नील बाम्हणे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुराव्याला सुरुवात केली. यावेळी मयुर घोडे यांनीही स्वप्नील यांना वेळोवेळी मोलाची साथ दिली.
( स्वप्नील बाम्हणे, मराठी बोला चळवळ )
पाठवपुरावा कसा केला?
जवळपास 5 महिन्यांपूर्वी नेरुळ रेल्वेस्थानकावर प्रधान्याने मराठी भाषेत स्थानकाचं नाव लिहावं, असं निवेदन स्वप्नील बाम्हणे यांनी स्थानक प्रबंधकांकडे दिले. मात्र, तिथून आपली जबाबदारी टाळत 'सिडको'कडे निवेदन देण्यास सांगितले. मग कार्यकर्त्यांनी सिडकोकडे निवेदन दिले. मात्र, तिथेही 'बघू-करु'ची भाषा ऐकयला मिळाली. त्यामुळे तीन महिने निवेदन तसंच पडून राहिलं.
त्यानंतर सिडकोच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाली. मग मराठी बोला चळवळीचे कार्यकर्ते स्वप्नील बाम्हणे यांनी पुन्हा निवेदन देण्यासाठी दोन-तीन फेऱ्या घातल्या.
पुन्हा सिडको गाठलं!
अखेर 7 नोव्हेंबर 2016 रोजी स्वप्नील बाम्हणे पुन्हा सिडकोमध्ये गेले आणि तिथे बांबुर्डे नामक अधिकारी भेटले. स्वप्नील यांनी बांबुर्डे यांना आपल्या मागणीसंदर्भात सविस्तर माहिती कळवली. मग सिडकोमधील अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य करुन कारवाईस सुरुवात केली.
अखेर 'नेरुल'चं 'नेरुळ' झालं!
अखेर 8 नोव्हेंबर 2016 रोजी नेरुळ स्थानकावरील मुख्य 8 फलक बदलून, मराठीत नामकरण करण्यात आले. आणखी काही बारीक-सारीक फलकं हिंदीत आहेत. मात्र, त्यासाठी निविदा काढाव्या लागतील. मात्र, तेही काम लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल, असं आश्वासन बांबुर्डे यांनी स्वप्नील बाम्हणे यांना दिले आहे.
विशेष म्हणजे, सरकारी कार्यालये आणि बँकांमध्येही मराठीला प्राधान्य देण्यासाठी मराठी बोला चळवळ कायम पाठपुरावा करेल, अशी माहिती मराठी बोला चळवळीचे कार्यकर्ते स्वप्नील बाम्हणे यांनी दिली.
मराठीच्या नावाने गळे काढत मतं मागणाऱ्या राजकीय पक्षांना जे जमलं नाही, ते 'मराठी बोला चळवळी'ने करुन दाखवले आहे. त्यामुळे केवळ 'बोलचाच भात अन् बोलाचीच कढी' असं न राहता, मराठी बोला चळवळीचे कार्यकर्ते स्वप्नील बाम्हणे सक्रीयपणे पाठपुरावा करत नेरुळ स्थानकाला मराठीत नाव मिळवून दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement