एक्स्प्लोर
पाण्याचं संकट मिटवण्यासाठी तीन-तीन लग्न!
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील डेंगणमाळ गावातील ही सत्य कथा आहे. पाण्याचा ताण मिटवण्यासाठी या गावातील एका व्यक्तीने तीन-तीन लग्न केले.
ठाणे : पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कुणी तीन-तीन लग्न करु शकतो? जेणेकरुन दोघी पाणी आणतील आणि तिसरी घरकाम करेन. यावर तुमचा विश्वास बसत नसेल. मात्र, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील डेंगणमाळ गावातील ही सत्य कथा आहे. पाण्याचा ताण मिटवण्यासाठी या गावातील एका व्यक्तीने तीन-तीन लग्न केले.
सखाराम भगत असं या व्यक्तीचं नाव आहे. एबीपी माझाची टीम त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा ते त्यांच्या दोन बायकांसोबत घरी होते. तर तिसरी बायको बाजारात गेली होती. अगोदर गावात पाण्याची मोठी समस्या होती. पाण्यासाठी तीन-तीन किमी पायपीट करावी लागायची. त्यामुळे घरातलं एकही काम होत नव्हतं. त्यामुळे तीन-तीन लग्न केले, असं सखाराम सांगतात.
स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांनंतरही सखाराम यांच्या दोन बायकांचा संपूर्ण दिवस पाणी आणण्यातच जातो. तर तिसरी पत्नी दिवसभर घरकाम पाहते. एवढं वय झालेलं असूनही पाणी आणण्यासाठी सखाराम यांच्या दोन पत्नी कितीतरी किमी पायपीट करत विहिरीचं पाणी भरतात.
मुंबईपासून अवघ्या दीडशे किमीवर असणाऱ्या डेंगणमाळ गावापर्यंत रस्ते आणि वीज तर पोहोचली आहे, मात्र पाण्याची मोठी समस्या आहे. सरकारने या गावात पाणी आणण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
वैतागलेल्या गावकऱ्यांनी गावात विहीर तर खोदली, मात्र त्यामुळे समस्या संपलेली नाही. विहिरीत पाणी भरण्यासाठी दुसऱ्या विहिरीतून आठवड्यातून दोन वेळा पाणी आणावं लागतं, जे पिण्यालायक नसतं. हे पाणी घरकामासाठी आणि जनावरांसाठी कामी येतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement