एक्स्प्लोर
धसईनंतर सांगली जिल्ह्यातील मळणगाव बनले दुसरे कॅशलेस गाव
सांगली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्व भारतीयांना कॅशलेस इंडियाचे आवाहन केले होते. यानंतर अनेक शहरी भागात कॅशलेस व्यवहाराचे प्रमाणात कमालीची वाढ झाली. पण यात ग्रामीण भाग देखील आता पुढाकार घेत आहे. ठाणे जिल्ह्यातील धसई हे देशातील पहिले कॅशलेस गाव बनल्यानंतर, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव ग्रामस्थांनी कॅशलेसची वाट पकडली आहे.
मळणगांवची लोकसंख्या जवळपास सात हजार आहे. या गावातील बहुतेक ग्रामस्थांचा उदर्निवाह दूध उद्योग, तसेच शेतीपूरक तत्सम व्यवसायावर चालतो. पण नोटाबंदीनंतर अनेकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. यानंतर पंतप्रधान मोदींनी कॅशलेस इंडियाचे आवाहन केल्यानंतर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक जनतेला ऑनलाईन आर्थिक प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. यामुळे कवठेमहांकाळमधील मळणगाव हे पहिले कॅशलेस गाव झाले आहे.
मळणगावमध्ये या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना या संकल्पनेचे महत्त्व पटवून देऊन, विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये जाणीव जागृती कार्यक्रम, नागरिकांबरोबर डिजीटल आर्थिक संवाद, शाळा, महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन सत्र, बाजारपेठांमध्ये माहितीचे प्रसारण या पद्धतीद्वारे लोकांमध्ये जनजागृती करून डिजीटल आर्थिक सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. परिणामी लोकांमध्ये जागृती होऊन डेबीट/ क्रेडीट कार्डस्, युएसएसडी, एईपीएस, युटीआय याव्दारे नागरिकांनी आपले व्यवहार करण्यास सुरूवात केली आहे.
इतर गावातील नागरिकांच्या एटीएमपुढील रांगा बघता, मळणगावच्या नागरिकांना त्यांच्या दारात पैसे मिळू लागल्याने तेही खुश आहेत. गावातच बँक मित्रांकडून पॉस मशिनव्दारे नागरिकांना पैसे देण्यात येत आहेत. गावातील बचत खात्यावरील एकूण व्यवहारांपैकी 58 टक्के हे ई ट्रान्झॅक्शन होत आहेत.
पैसे काढणे, पैसे ऑनलाईन पाठविणे, एका खात्यातून इतर बँक खात्यावर जमा करणे इत्यादी प्रकारे व्यवहार ऑनलाईन चालू करण्यात आले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील पहिले 100 टक्के कॅशलेस गावाचा मान मळणगांवने पटकावला आहे.
संबंधित बातम्या
ठाणे - धसई गावातील कॅशलेस व्यवहार सुरु
सांगलीची कॅशलेस पानपट्टी
कॅशलेस अभियानात जळगाव, नंदुरबार जिल्हे अग्रेसर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement