(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha katta : भाषणानं मैदान गाजवण्यासाठी बाळासाहेबांनी राज ठाकरेंना दिला होता 'हा' सल्ला...
ज्यावेळी राज ठाकरे यांनी फी वाढीच्या विरोधात मुंबईत पहिला मोर्चा काढला होता. त्यावेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंना एक सल्ला दिला होता.
Raj Thackeray Majha katta : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातील एक किस्सा सांगितला आहे. ज्यावेळी राज ठाकरे यांनी फी वाढीच्या विरोधात मुंबईत पहिला मोर्चा काढला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना एक सल्ला दिला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंना दिलेला सल्ला हा भाषणाच्या संदर्भातील होता.
बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंना नेमका कोणता सल्ला दिला
फी वाढीच्या विरोधात मी मुंबईत पहिला मोर्चा काढला होता. त्यावेळी माझे भाषण झाल्यानंतर कोणतरी माझ्याकडे आले आणि त्याने मला सांगितले की माँ आली आहे मोर्चाला. मी गेलो तर माँ गाडीत बसली होती. त्यावेळी माँ ने मला गाडीत बसवले, काका (बाळासाहेब ठाकरे) वाट बघत असल्याचे सांगितले. घरी आलो त्यावेळी बाळासाहेब बसले होते. बाळासाहेब म्हणाले तुझे भाषण मी ऐकले. त्यावेळी मी म्हणालो कसे ऐकले माझे भाषण. माझे भाषण चालू असताना एकाने बाजूच्या फोनच्या स्टॉलवरुन स्पीकर ऑन करुन बाळासाहेबांना फोन लावला होता आणि माझे भाषण ऐकवले होते असे राज यांनी सांगितले. त्यानंतर बाळासाहेब म्हणाले की, 'माझ्या बापाने जे मला सांगितले ते मी तुला सांगतो. जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल असे बाळासाहेबांनी सांगितले'. आपण किती हुशार आहोत हे न सांगता लोक कशी हुशार होतील हे भाषणातून सांग असे त्यांनी सांगितल्याचे राज यांनी सांगितले. दुसरी गोष्ट मी आज काय बोललो त्यापेक्षी मी आज विचार करायला काय दिलं याचा विचार करुन भाषण कर असा सल्ला बाळासाहेबांनी दिल्याचे राज यांनी सांगितले.
माझी भाषणाची शैली हळूहळू विकसीत होत गेली. उत्तम भाषण करणारी असंख्य लोकं आहेत. भाषण करताना माझे सहज असते, असे राज यांनी सांगितले. माझे आजोबा हे कडवट हिंदुत्ववादी होते. एका पुस्तकावरुन माझे आजोबा काढू नका. ते कर्मकांडाच्या विरोधात होते, देव धर्माच्या विरोधात नव्हते. धर्मांध हिंदू मला नको आहेत, धर्माभिमानी मला हवे आहेत असे राज ठाकरे म्हणाले. ज्यांचे धर्मावरती प्रेम आहे, तोच माणूस धर्मातील चुकीच्या गोष्टी सांगू शकतो. माझे विचार हे आजोबांच्या विचारांच्या जवळ आहेत, असे राज म्हणाले.
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यातील पहिला संवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याशी साधला. यावेळी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी दिलखुलास संवाद साधला.
महत्त्वाच्या बातम्या:
- Raj Thackeray Majha katta : भोंगा हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय, प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा : राज ठाकरे
- Devendra Fadnavis : राज ठाकरेंच्या सभेआधी मुंबईत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला 'बुस्टर डोस'! राज्यात महासभांचा धडाका