एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझा इफेक्ट : पैसे न भरल्याने डांबलेल्या रुग्णाची सुटका
नागपूर : वैदकीय व्यवसायाला काळिमा फासणारी घटना नागपुरात समोर आली आहे. गरीब आदिवासी रुग्ण उपचाराचे पूर्ण पैसे भरु शकत नसल्याने एका महाभाग डॉक्टराने त्याला तब्बल दीड महिने रुग्णालयात डांबून ठेवल्याचं समोर आलं आहे.
पैसे भरु शकत नसल्यामुळे हतबल झालेल्या रुग्णाने एबीपी माझाकडे सुटकेची याचना करणारा व्हिडियो पाठवला. एबीपी माझाने डॉक्टरकडे जाऊन विचारणा केली आणि दीड महिने बंदिस्त असलेल्या गरीब संजय खांडवायेची सुटका झाली.
गोंदिया जिल्ह्यातल्या तेढा गावच्या संजयचा 25 मार्च रोजी एसटीच्या धडकेत अपघात झाला. अपघातात उजवा पाय गमावलेल्या संजयवर नागपूरच्या ग्रीन सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचार पूर्ण झाले, मात्र त्याचे पैसे न भरल्यानं हॉस्पिटलनं त्याला सोडण्यास नकार दिला.
8 एप्रिलपासून संजयला या हॉस्पिटलमध्ये कैद करण्यात आलं आहे. त्याला खाणंपिणंही दिलं जात नाही. संजयच्या कुटुंबीयांनी तीन वेळा थोडे थोडे पैसे आणून त्याच्या सुटकेची विनंती केली. संजयनं आपल्या सुटकेची आशाच सोडली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यानं आपल्या मित्राच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला आणि एबीपी माझाकडे पाठवला.
संजयच्या सुटकेची विनंती केली असता डॉक्टरांनी ती उडवून लावली. जेव्हा त्यांना कायद्याची भाषा सांगितली, तेव्हा कुठे हॉस्पिटलनं संजयची सुटका केली.
'माझा'ने या प्रकरणी हॉस्पिटलची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक डॉक्टरानं तिथून काढता पाय घेतला.
डॉक्टरी हा एकच व्यवसाय असा आहे की ज्यात मानवसेवेची शपथ घेतली जाते. मात्र मानवसेवा करताना अनेकदा माणुसकी विसरली जात आहे, अशी भीती उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement