एक्स्प्लोर

Weekly Recap :  राम नवमी, छत्रपती संभाजीनगर राडा ते IPL चा थरार, वाचा या आठवड्यात काय घडलं?

या आठवड्यात 27 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पाहुयात या बातम्यांचा आढावा.

Weekly Recap : प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आपण देशासह राज्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा (Weekly Recap) आढावा घेत असतो. या आठवड्यात 27 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. गुरुवारी देशभरात रामनवमी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात झालेल्या राड्याचं गालबोट या उत्सवाला लागलं. तसेच याच आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली. पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. अशा विविध घडामोडी या आठवड्यात घडल्या. पाहुयात त्याचा एक आढावा....

27 मार्च 2023

NCERT चा अभ्यासक्रम बदलणार

NCERT: एनसीईआरटीच्या सर्व श्रेणींच्या अभ्यासक्रमात बदल होणार असून नवीन पाठ्यपुस्तक शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिली आहे.
(वाचा सविस्तर)

राठी हत्याकांडातील आरोपी अल्पवयीन, तुरुंगातून सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
 
पुण्यातील गाजलेल्या राठी मर्डर केसमध्ये (Rathi Murder Case Pune) एक मोठी अपडेट आली आहे. गुन्हा ज्यावेळी घडला होता त्यावेळी आरोपी हा अल्पवयीन होता हे सिद्ध झाल्यानं न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. नारायण चेतनराम चौधरी असं या आरोपीचं नाव असून त्याने 28 वर्षे तुरुंगात घालवली आहेत. (वाचा सविस्तर)

28 मार्च 2023

मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या धुळ्यातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू 

Mumbai News : मुंबईत मंत्रालयासमोर (Mantralaya) विष (Poison) प्राशन करणाऱ्या धुळ्यातील (Dhule) महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शीतल गादेकर असं या महिलेचं नाव असून तिने काल (27 मार्च) मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न  केला होता. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन जे जे रुग्णालयात दाखल केलं होतं. धुळे एमआयडीसीमधील (MIDC) एका प्लॉटसंदर्भात वाद होता. त्यातूनच तिने आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला होता. परंतु उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. (वाचा सविस्तर)

 30 जून पर्यंत आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करता येणार

सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी घोषण केंद्र सरकारने केली असून आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. 30 जूनपर्यंत आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करता येणार आहे. या आधी ही मुदत 31 मार्च होती. आता ती वाढवण्यात आली आहे. (वाचा सविस्तर)

पीएफच्या 6 कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज; EPFO कडून व्याज दरात वाढ

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मोठा निर्णय घेतला आहे.  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वरील व्याजात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे EPFO च्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (वाचा सविस्तर)

29 मार्च 2023 

Girish Bapat Passed Away : भाजप (BJP) खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांचं दीर्घ आजाराने निधन  झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (वाचा सविस्तर)

गोविंद पानसरे हत्याकांडातील फरार आरोपींबद्दल नवे धागेदोरे हाती

Govind Pansare Murder Case : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा नव्याने तपास करणाऱ्या एटीएसला (ATS) याप्रकरणी पहिलं यश मिळालं आहे. या प्रकरणातील दोन फरार आरोपी सारंग अकोलकर (Sarang Akolkar) आणि विनय पवार (Vinay Pawar) यांच्याबाबत नवे धागेदोर सापडल्याचं तपास यंत्रणेने सादर केलेल्या सीलबंद अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. (वाचा सविस्तर)

UPI व्यवहार 1 एप्रिलपासून महागणार

दोन दिवसांतच म्हणजेच, 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष (New Financial Year) सुरू होणार आहे. नव्या आर्थिक वर्षात आता UPI व्यवहार (UPI Transaction) देखील महाग होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट्सबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. (वाचा सविस्तर)

30 मार्च 2023

आज देशभरात राम नवमीचा उत्साह

Ram Navami 2023 : आज देशभरात राम नवमीचा (Ram Navami) उत्साह पाहायला मिळत आहे. यावर्षीची राम नवमी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. यानिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली जात आहे. रामनवमीच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील (Shirdi) साई मंदिरात साई नामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला आहे. (वाचा सविस्तर)

छत्रपती संभाजीनगर घटनेप्रकरणी 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील किराडपुरा (Kiradpura) भागात मध्यरात्री तणाव निर्माण झाला होता. रामनवमीच्या पार्श्वभूमी राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या घोळक्याने उत्सवासाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली. पाहता पाहता घटनेनं रौद्ररूप धारण केलं.  या प्रकरणी अखेर पोलिसांनी 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल केला आहे. (वाचा सविस्तर)

31 मार्च 2023

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या गोंधळात एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) बुधवारी मध्यरात्री दोन गटात तुफान राडा पाहायला मिळाला. यावेळी दोन गट समोरासमोर आल्याने दगडफेक करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या घटनेत काही जण जखमी झाले आहेत. तर या गोंधळात एकाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. (वाचा सविस्तर)

घर खरेदी करणारांना दिलासा, रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ नाही

तुम्ही जर घर खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. राज्य शासनाने घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील रेडीरेकनरच्या दरात (Ready Reckoner) यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वाचा सविस्तर)

संपकाळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री, पगारातून 1200 कोटींची कपात

Government Staff : जुनी पेन्शन योजना (old pension scheme) लागू करा, या मागणीसाठी संप (Strike) करणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना राज्य शासनानं दणका दिला आहे. संपाच्या काळातील सात दिवसांचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांचे संपकाळातील वेतन (Salary) कापले जाणार आहे. यामुळं राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी आणि शिक्षकांच्या पगारातून सुमारे 1200 कोटी रुपयांची कपात होणार आहे. (वाचा सविस्तर)

संयोगिताराजे छत्रपती यांच्या पोस्टने खळबळ

संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास (Nashik Kalaram Mandir) भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, यावेळी महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. हा सगळा प्रकार संयोगीता राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (वाचा सविस्तर)

सलामीच्या सामन्यात गुजरातचा चेन्नईवर पाच विकेट्सने विजयी  

आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामाच्या सलामी सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) विजयी सुरुवात केली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने चेन्नईवर (Chennai Super Kings) पाच विकेट्सने विजय मिळवला. (वाचा सविस्तर)

1 एप्रिल 2023

 संजय राऊतांना धमकी, पुण्यातून दोन जण ताब्यात

Sanjay Raut : शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू असा धमकीचा मेसेज राऊतांना आला आहे. लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून धमकी मिळाली आहे. (वाचा सविस्तर)

 छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरणातील दोन मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) किराडपुरा भागात बुधवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादानंतर जाळपोळ आणि दगडफेकीची घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 400 पेक्षा अधिक हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्तापर्यंत 10 लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील दोन संशयीत मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. (वाचा सविस्तर)

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget