एक्स्प्लोर

Mumbai News : मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या धुळ्यातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू 

Mumbai News : मुंबईत मंत्रालयासमोर काल (27 मार्च) विष प्राशन करणाऱ्या धुळ्यातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शीतल गादेकर असं या महिलेचं नाव आहे.

Mumbai News : मुंबईत मंत्रालयासमोर (Mantralaya) विष (Poison) प्राशन करणाऱ्या धुळ्यातील (Dhule) महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शीतल गादेकर असं या महिलेचं नाव असून तिने काल (27 मार्च) मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न  केला होता. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन जे जे रुग्णालयात दाखल केलं होतं. धुळे एमआयडीसीमधील (MIDC) एका प्लॉटसंदर्भात वाद होता. त्यातूनच तिने आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला होता. परंतु उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

काय आहे प्रकरण?

शीतल गादेकर या महिलेच्या पतीच्या नावे धुळे एमआयडीसी परिसरात प्लॉट नंबर पी 16 आहे. हा प्लॉट 2010 मध्ये तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संगणमत करुन शितल गादेकर यांच्या पतीच्या नावे असलेला हा प्लॉट नरेश कुमार मानकचंद मुनोत या व्यक्तीच्या नावे बोगस खोटी नोटरी बनवून नावावर करुन घेण्यात आला. तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी विनाकायदेशीर खरेदी खत ऐवजी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बोगस सह्या करुन, शितल गादेकर यांचे पती रवींद्र गादेकर यांचा छायाचित्रांचा गैरवापर करत बोगस इसम उभा केला.  त्याच्या माध्यमातून हा प्लॉट हस्तांतरित करण्यात आला, अशी तक्रार शितल गादेकर यांनी वारंवार प्रशासनाकडे केली होती. त्यांनी याबाबत माजी मुख्यमंत्री, माजी उद्योग मंत्री, माजी मुख्य सचिव, तसेच प्रधान सचिव, मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय, रजिस्टर जनरल अधिकारी मुंबई उच्च न्यायालय, तसेच पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र, पोलीस अधीक्षक धुळे, तसेच प्रादेशिक एमआयडीसी अधिकारी, विभागीय एमआयडीसी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य न्यायाधीश, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. 

पाठपुरावा करुनही न्याय न मिळाल्याने टोकाचं पाऊल

या जागेच्या संदर्भात न्याय मिळावा या मागणीसाठी शीतल गाडेकर यांनी 2020 पासून सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. तसंच 27 मार्च रोजी मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी मागील महिन्यात दिला होता. मात्र तरी देखील न्याय मिळत नसल्याने नैराश्यातून त्यांनी मंत्रालयासमोर विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेत त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्युनंतर तरी सरकार दरबारी याची दखल घेतली जाणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Recruitment:करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज कधीपासून भरता येणार? पगार किती मिळणार?  
करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती,  पगार किती मिळणार? अर्ज कसा करायचा?

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Recruitment:करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज कधीपासून भरता येणार? पगार किती मिळणार?  
करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती,  पगार किती मिळणार? अर्ज कसा करायचा?
FDI : लवकरच पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढीला मंजुरी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार
लवकरच पेन्शन क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणूक, मर्यादा हटवली जाणार,संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार
Pachpadra Refinery: राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
Kolhapur Crime: कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन
सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन
Embed widget