एक्स्प्लोर

नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव; संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नीच्या पोस्टने खळबळ

Nashik News: देशभरात काल रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, यावेळी महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली.

Maharashtra Nashik News: शाहू महाराज यांच्याविषयी वेदोक्त प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी महाराजांनी धार्मिक क्रिया पुराणेक्त विधिनुसार न करता वैदिक विधिनुसार करण्याचा आदेश काढला. त्यावेळी अनेक रोषांना सामोरे जावे लागले होते. आता शाहू महाजांच्या वंशज संयोगिताराजे छत्रपती (Sanyogeetaraje Chhatrapati) यांच्या एका सोशल मीडिया (Social Media Post) पोस्टवरून हा वाद पुन्हा निर्माण झाला आहे. 

देशभरात काल रामनवमीचा उत्सव (Ram Navami 2023) साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास (Nashik Kalaram Mandir) भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, यावेळी महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. हा सगळा प्रकार संयोगीता राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात पूजा करताना मंदिरातील तथाकथित महंतांनी 'पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यातील असल्याने मी त्यास विरोध दर्शवला. मात्र वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे महंतांनी सांगितले, अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजेंनी रामनवमीच्या दिवशी केल्याने चर्चांना एकच उधाण आले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sanyogeetaraje Sambhajiraje Chhatrapati (@sanyogeetaraje_chhatrapati)

दरम्यान, संयोगिताराजे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, मी मंदिरात महामृत्युंजय मंत्र म्हटला. मंदिरातील महंतांनी पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हटले. मात्र शाहू महाराजांनी कर्मकांडाला विरोध केल्याने आणि आपण त्या घराण्याचा वारसा चालवत असल्याने त्यास विरोध केला. या वेळी मात्र महंतांनी तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट केले. मात्र यास न जुमानता मी या ठिकाणी महामृत्युंजय मंत्र, रामरक्षा पठण केले. त्यावेळी त्यांना सांगितले ज्या मंदिरात आपण आजच्या काळातही नियम लावत आहात, ती मंदिरे वाचवली कोणी? छत्रपतींनी वाचवली! मग छत्रपतींना शिवकण्याचे धाडस करू नका, अशा शब्दांत पोस्टद्वारे इशारा दिल्याचे दिसत आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे काळाराम मंदिराच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आले.

शाहू महाराज वेदोक्त प्रकरण काय? 

धार्मिक क्रिया पुराणोक्त विधीनुसार न करता त्या फक्त वैदिक विधी नुसारच करण्यात याव्यात असा आदेश शाहू महाराज यांनी काढला होता. यास नारायणराव राजोपाध्ये यांनी फेटाळले. त्यावर शाहू महाराजांनी नारायणराव राजोपाध्ये यांना कुलपुरोहित या पदावरून काढून टाकत जमिनी सरकार जमा करण्यात आल्या. हा वाद वाढत जाऊन थेट ब्रिटिश सरकारकडे गेला. मात्र ब्रिटिश सरकारने राजोपाध्ये यांना सुनावले. मात्र त्यानंतरही वाद चिघळत राहिला. शेवटी करवीर धर्मपीठाचा वेदोक्त प्रकरणी निर्णय झाला. यात ते म्हणतात की, छत्रपती शाहू महाराज यांचे घराणे क्षत्रिय असून वेदोक्त कर्म करण्यास काही हरकत नसल्याचे म्हटले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

नाशिकच्या काळाराम मंदिरास नाव कसं पडलं? काय आहे पंचवटीचा इतिहास?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24  डिसेंबर 2024 : ABP MajhaMahayuti Government : काही मंत्र्यांना मुख्य इमारतीत तर काहींना विस्तारित इमारतीत दालनMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24  डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
Embed widget