EPFO : पीएफच्या 6 कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज; EPFO कडून व्याज दरात वाढ
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) व्याज दरात वाढ केली आहे. या निर्णयाचा फायदा जवळपास सहा कोटी पीएफ खातेदारांना होणार आहे.
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वरील व्याजात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे EPFO च्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 8.15 टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी EPFO कडून 8.10 टक्के दराने व्याज दिले जात होते. यंदाच्या पीएफच्या व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
EPFO ने व्याज वाढवले
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी EPF खातेधारकांसाठी 8.15 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा देशातील 6 कोटींहून अधिक ईपीएफ खातेधारकांना होणार असून त्यांच्या खात्यात अधिक पैसे जमा होतील. 2021-22 साठी, EPFO ने व्याजदर 8.1 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. हा व्याज दर गेल्या चार दशकांतील सर्वात खालच्या पातळीवर आला होता. 2020-21 या आर्थिक वर्षात तो 8.50 टक्के होता.
EPFO fixes 8.15 pc interest rate on employees' provident fund for 2022-23: Sources
— Press Trust of India (@PTI_News) March 28, 2023
अर्थ मंत्रालय काढणार अध्यादेश
गेल्या वर्षी म्हणजेच 2021-22 साठी हा व्याजदर 8.1 टक्के दराने होता. हा व्याजदर गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी असून सरकारच्या या निर्णयाला मोठा विरोध झाला होता.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) व्याज दर निश्चित करतात. अर्थ मंत्रालय हे निश्चित केलेले व्याज दर लागू करण्याबाबतचे आदेश जारी करतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची दोन दिवसीय बैठक 27 मार्चपासून सुरू झाली होती.
EPFO चे जवळपास 6 कोटी खातेदार आहेत. या कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे 27.73 लाख कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन EPFO च्या माध्यमातून केले जाते.
EPFO Interest Rate: ईपीएफओ या ठिकाणी करते गुंतवणूक
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO अनेक ठिकाणी पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा काही भाग व्याजाच्या स्वरूपात खातेदारांना परत केला जातो. सध्या EPFO कर्जाच्या पर्यायांमध्ये 85 टक्के गुंतवणूक करते. ज्यामध्ये सरकारी रोखे आणि बाँडचा समावेश आहे. उर्वरित 15 टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतवली जाते. पीएफचे व्याज कर्ज आणि इक्विटीच्या कमाईच्या आधारावर ठरवले जाते.