CSK vs GT, IPL 2023 : चेन्नईचा गुजरातकडून सलग तिसरा पराभव, 'थाला' धोनी निराश, मॅचनंतर सांगितलं कारण...
Chennai Super Kings vs Gujarat Titans : आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात गुजरातने चेन्नईवर पाच विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईचा गुजरातकडून पराभव झाल्यानंतर कर्णधार धोनी निराश आहे.
CSK vs GT, MS Dhoni : आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामाच्या सलामी सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) विजयी सुरुवात केली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने चेन्नईवर (Chennai Super Kings) पाच विकेट्सने विजय मिळवला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नईचा गुजरातकडून पराभव झाल्यानंतर कर्णधार महेंद्र सिंह धोनी निराश आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या चेन्नईच्या संघाने 178 धावा केल्या. चेन्नईने उभारलेली धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातने 19.2 षटकांमध्ये धावांचं लक्ष्य गाठलं.
या सामन्याद्वारे चेन्नईच्या संघाला गुजरातविरुद्ध सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवानंतर चेन्नईचा 'कॅप्टन कूल' धोनी खूपच निराश दिसला. सामन्यानंतर धोनीनं या पराभवाचं खरं कारण सांगितलं आहे. आयपीएलमध्ये (IPL 2023) गुजरातने सलग तिसऱ्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला आहे. गेल्या सीझनमध्ये (IPL 2022) गुजरातने चेन्नईचा दोन वेळा पराभव केला होता.
धोनीनं सांगितलं पराभवाचं कारण
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनीनं सामन्यानंतर प्रतिक्रिया देत म्हटलं की, ''आम्हाला माहित होते की या मैदानावर दव पडेल. आम्ही फलंदाजीमध्ये आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. रुतुराज गायकवाडने चांगली फलंदाजी केली. त्याची फलंदाजी पाहणं आनंददायक होतं. तो ज्या प्रकारे चेंडूला टोलवण्याची निवड करतो, ते पाहणं एक छान अनुभव आहे. माझ्या मते युवा खेळाडूंचं क्रिकेटमध्ये येणं महत्त्वाचं आहे.''
चेन्नईची फलंदारी समाधानकारक : धोनी
धोनीने चेन्नईतून पदार्पण करणारा गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरबद्दल याबद्दल सांगितलं की, ''राजवर्धन या सामन्यातून स्वतःला सिद्ध केलं आहे. राजवर्धन हंगरगेकरकडे वेग आहे आणि काळानुसार त्याची गोलंदाजी आणखी चांगली होईल. मला वाटते की गोलंदाज सुधारतील. मात्र नो-बॉल ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या नियंत्रणात आहे, त्यामुळे तुम्हाला त्यावर काम करणं आवश्यक आहे.''
धोनी पुढे डाव्याखुऱ्या गोलंदाजांबाबत सांगितलं की, ''संघाची एकंदर गोलंदाजी समाधनकारक होती. मला वाटले की दोन डावखुरे गोलंदाज चांगले पर्याय आहेत म्हणून मी त्यांची निवड केली. शिवम हा एक पर्याय होता.''
गुजरातचा चेन्नईवर पाच विकेट्सने विजय
शुभमन गिलच्या अर्धशतकानंतर राशिद खान याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. शुभमन गिल याने 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर मोक्याच्या क्षणी राशिद खान याने तीन चेंडूत 10 धावांची खेळी केली. गुजरातने चेन्नईचा सहा गडी राखून पराभव केला. चेन्नईने दिलेले 179 धावांचे आव्हान गुजरातने चार चेंडू आणि पाच विकेट राखून पार केले. चेन्नईकडून राजवर्धन हंगरगेकर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तुषार देशपांडे आणि जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 : शुभमन गिलची सलामी अन् राशिदचा फिनिशिंग टच, गुजरातचा चेन्नईवर विजय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
