तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
Solapur News: जाणीवपूर्वक आम्हाला छेडण्यासाठी ही शिवीगाळ केल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार अमर कदम यांनी केला. या आरोपामुळे राडा प्रकरणात आमदारांचे स्वीय सहाय्यक जयेश कदम यांचं नाव जोडलं जात आहे.

Tuljapur Firing: तुळजापूर येथील दोन गटाचा राडा आणि त्यानंतर झालेल्या गोळीबार प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएच नाव जोडलं जात आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक जयश कदम यांनी तुळजापूर येथील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पिटू गंगणेला सोबत घेऊन आमचे नातेवाईक करत आलेल्या तुळजापूर नळदुर्ग रस्ते कामावर जात शिवीगाळ केली. जाणीवपूर्वक आम्हाला छेडण्यासाठी ही शिवीगाळ केल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार अमर कदम यांनी केला. या आरोपामुळे राडा प्रकरणात आमदारांचे स्वीय सहाय्यक जयेश कदम यांचं नाव जोडलं जात आहे.
राजकीय षड्यंत्राचा रंग देण्याचा प्रयत्न
दरम्यान, भाजपने मात्र आरोप फेटाळत रस्ते कामाच्या पाहणी करण्यासाठी गेले असता तिथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येण्याचं प्रयोजन काय? कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्याला राजकीय षड्यंत्राचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऋषी मगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ केली. घडलेली घटना दुर्दैवी त्याचा समर्थन कोणीही करणार नाही. कठोर कारवाई करण्येची आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. मात्र, राजकीय पोळी भाजण्यासाठी वाद कसा चिघळला जाईल हे पाहिले जात आहे. धाराशिव येथील उबाठाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून हे होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.
तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा समोर
मात्र, तुळजापुरातील या वादानंतर आचार संहिता असताना परवाना धारक शस्त्र जमा केले जातात. मात्र हातात कोयते आणि गावठी कट्टे घेऊन दहशत माजवण्यात आली. त्यातून कोयत्याने हल्ला आणि गोळीबार करण्यात असल्याचा आरोप अमर कदम यांनी केला. तुळजापूर येथील राड्यात अमर कदम यांचे भाऊ कुलदीप कदम यांच्या मानेवर कोयत्याने वार झाले आहेत. त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत. गोळीबार प्रकरणामुळे तुळजापुरातील ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान, गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून कुलदीप मगर यांच्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























