Weather Alert: राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा
बहुतांश ठिकाणी राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याची नोंद झाली असून येत्या पाच दिवसात राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra weather update: गेल्या काही दिवसात दक्षिणेकडील राज्यांना पावसानं झोपलंय. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे अरबी समुद्र ते राजस्थान व परिसरातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. याचा परिणाम उत्तर भारतावरील तापमानावर झालेला दिसतो. दरम्यान राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे. कोरड्या व शुष्क वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे तापमान हळूहळू घसरत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार(IMD), येता चार ते पाच दिवसात किमान तापमान 1-2 अंशांनी घसरणार आहे. तर कमाल तापमानातही एक ते दोन अंशांनी वाढ होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना सध्या पहाटे गाठ आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवणार आहे. (Weather alert)
राज्यात डिसेंबर महिन्यात तीव्र थंडीने नागरिक कुडकुडले. नव्या वर्षात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. बहुतांश भागात ढगाळ वातावरणाने तापमानात चढ-उतार पाहायला मिळाला. अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने हवामान बदलले होते. आता राज्यातील थंडी पुन्हा एकदा जाणवू लागली आहे.
हवामान विभागाचा इशारा काय?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उत्तरेकडील राज्यांमध्ये येता 24 तासात 2 ते 3 अंशांनी तापमानात घट होणार आहे. तसेच दक्षिणेकडील नैऋत्य मौसमी पावसाचं वातावरण आता येत्या दोन दिवसात कमी होणार आहे. अरबी समुद्राच्या नैऋत्य भागापासून राजस्थान ते गुजरात पर्यंत हवेचा दाब राहणार आहे. परिणामी महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात थंडीला पोषक वातावरण तयार झालंय. प्रादेशिक हवामानाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात येत्या पाच ते सहा दिवसात किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट होणार आहे.
25 जानेवारीला राज्यात कुठे कसं तापमान होतं?
धुळे - 10.5°C
निफाड - 11.3°C
परभणी (कृषी) - 12.9°C
धाराशिव - 13.4°C
जळगाव - 14°C जेऊर - 14.5°C
नाशिक - 14.8°C
अहिल्यानगर - 14.7°C
पुणे - 15.5°C
नागपूर - 15.5°C
ब्रह्मपूरी - 15.2°C
वर्धा - 15.2°C
गडचिरोली - 15°C
गोंदिया - 15.8°C
भंडारा - 15°C
परभणी - 15.3°C
सातारा - 15.5°C
अमरावती - 16.1°C
सांगली - 16.3°C
बुलढाणा - 16.4°C
छत्रपती संभाजीनगर - 16.4°C
मालेगाव - 16°C
सोलापूर - 18.1°C
कोल्हापूर - 18.1°C
डहाणू - 18.9°C
वाशीम - 19.6°C
यवतमाळ - 18°C
सांताक्रूझ - 20.2°C
रत्नागिरी - 20.6°C
महाबळेश्वर - 17.4°C
बहुतांश ठिकाणी राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याची नोंद झाली असून येत्या पाच दिवसात राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: