एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Sabha : औरंगाबाद नामांतरण ते काश्मिरी पंडित, औरंगाबाद सभेतील उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे

Uddhav Thackeray Sabha Key Points: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद नामांतरण, काश्मिरी पंडित, भाजपच्या प्रवक्त्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली नाचक्की यावर भाष्य केले.

Uddhav Thackeray Sabha : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची स्वाभिमान सभा आज औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात पार पडली. या सभेत त्यांनी औरंगाबाद नामांतरण, काश्मिरी पंडित, पाणी प्रश्न, भाजपच्या प्रवक्त्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली देशाची नाचक्की, हिंदूत्व, बाबरी मशीद अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. जाणून घ्या  उद्धव ठाकरे  यांच्या भाषणातील महत्वाचे दहा मुद्दे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले वचन मी विसरणार नाही

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले वचन आहे. ते मी कधीही विसरणार नाही ते केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. नाव बदलायला मी आत्ता बदलेल पण पाणी प्रश्न, रस्ते खराब असताना मी शहराचे नाव बदलणार नाही.  या शहराचे जेव्हा नामांतर करेल पण या संभाजी महाराजांनी देखील आदर्श वाटेल असेल नगर मी करणार आहे. 

फडणवीस अयोध्येला बाबरी पाडण्यासाठी गेले होते का?

हिंदुत्वासाठी कोणी केलं हे एका मंचावर होऊन जाऊ द्या.  देवेंद्र फडणवीस अयोध्येला बाबरी पाडण्यासाठी गेले होते का? हे समोर आणले पाहिजे आमचं हिंदूत्व पोकळ नाही.  संभाजीनगर साक्ष आहे, आमचे मोरेश्वर सावे शिवसैनिकांना घेऊन गेले होते. 

दुसऱ्या धर्मांचा आदर करणे ही आम्हाला महाराजांनी दिलेली शिकवण

बाळासाहेबांनी मुस्लिमांचा द्वेष कधी केला नाही. दुसऱ्या धर्मांचा आदर करणे ही आम्हाला महाराजांनी दिलेली शिकवण आहे. प्रत्येकाने आपला धर्म हा घरात ठेवावा. घराबाहेर पडताना देश हाच आपल्या प्रत्येकाचा धर्म आहे.  आपल्य देवीदेवतांचा कोणी अपमान करायचा नाही आणि आपणही इतरांचा करायचा नाही.

भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली

भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली आहे. भाजपच्या प्रवक्त्यानं प्रेषित मोहम्मदांचा अपमान केला, त्यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली. भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही. राजकारण आपल्या जागी परंतु ते आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आहेत, त्यांचा फोटो कचरापेटीवर लावला, हे तुम्हांला मान्य आहे का? 

महाराष्ट्राला पुढे नेणारी ही अडीच वर्षे...

विकास करतोय, महाविद्यालय उभं करतोय, बाहेरच्या कंपन्या आज येथे येत आहेत, गडकिल्ल्यांच संवर्धन करतोय, संत विद्यापीठ उभारतोय... हे हिंदुत्व नाही?  महाराष्ट्राला पुढे नेणारी ही अडीच वर्षे...  जनतेच्या आशिर्वादामुळे सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहे. विकासाच्या देशाने महाराष्ट्राला पुढी नेणारी ही अडीच वर्षे होती. अडीच वर्षे झाल्यावरही सरकार पडत नाही म्हणून विरोधक अस्वस्थ झाली आहे.  

25 वर्षे जे वैरी होते त्यांनी आम्हाला  मानसन्मान दिला

25 वर्षे मांडीवर होते, ते आता उरावर  बसले आहे. जे मित्र होते ते आता हाडवैरी झाले आणि वैरी होते ते मित्र झाले.  25 वर्षे जे वैरी होते त्यांनी आम्हाला  मानसन्मान दिला. 

हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? 

आरएसएस ने सांगितले, इतिहास कोणी पुसु शकत नाही, प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधायची गरज नाही हे ऐकून बरं वाटलं. कारण आत्ता आपण नाजुक परिस्थितीतुन जात आहोत. हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? भाजपा जर ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारली पाहिजे. हिंदुत्व टोपीतून का दाखवावं लागतं, ते तुमच्या वागण्यातून का दिसतं नाही? 

बाळासाहेब नसते तर तुम्ही दिल्ली काबीज केली असती का? 

अमरनाथ यात्रेवर गंडांतर आले तेव्हा शिवसेनाप्रमुख उभे राहिले नसते, कश्मिरी पंडितांच्या पाठीशी ते उभे राहिले नसते तर आज दिल्लीपर्यंत तुम्ही आला असता का? परत काश्मिरमध्ये आता तिच वेळ आली आहे.  हिंमत असेल तर कश्मिरमध्ये 'हनुमान चालिसा' वाचा, पंडितांची रक्षा करा. ही शिवसेना शिवसेनाप्रमुखांची नाही, असे म्हणता? मग कोणाची आहे?  असा सवाल उद्धव ठाकरेंनी या उपस्थित केला.

निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढल्या जातात 

आम्हीं शेतकर्‍याला बांधील आहोत निवडणुकीत भुलथापा मारायच्या आणि नंतर निवडणुकीत असे बोलायच असत म्हणायचं. परत निवडणुका आल्या की धर्माच्या नावाने अफूची गोळी द्यायची. अच्छे दिन आले का? कधी येणार? काहीच नाही, ते झटकून टाकतात. निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढल्या जातात. मतदार मेला तरी चालेल. निवडणुका आली की पुन्हा कोणती तरी मशीद पाडू म्हणजे सगळे पुन्हा त्यांच्या मागे, अशी भाजपाची थेरं आहेत. 

ईडी, सीबीआय लावा, पण काश्मीरमध्येही धाडी टाका

राज्यात बांग्लादेशी येऊन राहत असतील, तर माझ्याच देशातील काश्मिरी पंडीतांना का राहता येत नाही.  देशात बांग्लादेशी येऊन राहतो, पण काश्मिरी पंडितांना घरं सोडावी लागतात. ईडी, सीबीआय लावा, पण काश्मीरमध्येही धाडी टाका. काश्मीरमध्ये पंडित भयभीत होऊन घरं सोडत आहेत, पण भाजपात एकही 'माय का लाल' नाही जो यावर बोलेल.

हिंदूत्व आमच्या धमन्यात आहे

हिंदुत्वाला बदनाम करताय, तुम्ही शिवसेनेला बदनाम करु शकत नाही. शिवसैनिक तळागाळात पोहचलाय. पाळंमुळं इतकी रुजली आहेत की तुमची पिढी उपटली जाईल पण शिवसेनेला तुम्ही काही करू शकणार नाही.  हे हात पहा, हे जीवंत सळसळत रक्त आहे, शिवसेनाप्रमुखांनी आमच्या धमन्यात टाकलेलं भगवं रक्त आहे. आमच्या अंगावर यायचा प्रयत्न करू नका, हे हात ढेकणं चिरडणारे नाहीत तर हिंदुत्वाचे रक्षण करणारे हात आहेत.

संभाजीनगरला पाणी देण्याचे प्रशासनाला आदेश

गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजीनगरचा पाणीप्रश्न बिकट होता. संभाजीनगरमध्ये 1972 सालची पाण्याची जुनी योजना सुरू करणार आहे. पाणी योजनेसाठी निधी पुरवणार आहे. कंत्राटदाराने हयगय केली तर दया, माया दाखवणार नाही. 

शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी मुंबईबाहेर आलो

शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी मुंबईबाहेर आलो आहे. सर्वात अगोदर बाळासाहेबांचे प्रिय शहर संभाजीनगरामध्ये आलो आहे. ढेकण चिरडण्यासाठी तोफेची गरज नसते. माझ्या सैनिकांची ताकद मला वाया घालावयाची नाही

 

 


 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?DSuraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget