एक्स्प्लोर

केंद्र विरुद्ध राज्य सरकारच्या वादाचा नवा अंक; CBI च्या सुबोध जयस्वाल यांच्याविरोधातील 15 वर्षे जुन्या प्रकरणी राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्रक

राज्य सरकार आणि केंद्रीय तपासयंत्रणा यांच्यातील वाद चर्चेत असतानाच राज्य सरकारनं सुबोध जयस्वाल (Subodh Jaiswal) यांच्या पंधरा वर्ष जुन्या हायकोर्टातील एका प्रकरणात अचानक प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. 

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्यात सध्या कधी नव्हे इतका टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Jaiswal) यांच्या पंधरा वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात राज्य सरकारनं अचानक हायकोर्टात आपलं उत्तर सादर केलंय. तेगली प्रकरणात पुणे सत्र न्यायालयानं जयस्वाल यांच्यासंदर्भात केलेली काही कठोर निरिक्षणं रद्द करण्यासाठी सुबोध कुमार जयस्वाल यांनी साल 2007 मध्ये हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. ज्यात आता राज्य सरकारनं आपलं प्रतिज्ञापत्र सादर करत हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती केली आहे.

हे प्रतिज्ञापत्र अचानक सादर करण्याचं कारण जेव्हा हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलं तेव्हा या प्रकरणी मध्यस्थ याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्यानं याची आठवण करून दिली, तसेच बरीच वर्ष प्रलंबित असलेल्या न्यायदानाच्या कामात आणखीन उशीर होऊ नये याच उद्देशनं ही भूमिका घेतल्याचं स्पष्ट करत याप्रकरणी गरज भासल्यास सविस्तर प्रतिज्ञापत्रही सादर करण्याची तयारी राज्य सरकारनं दर्शवली आहे.

काय आहे हे प्रकरण?
नव्वदच्या दशकातील बनावट स्टँप पेपर घोटाळा उघडकीस येताच सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नेतृत्त्वाखाली एक एसआयटी स्थापन करण्यात आली होती. साल 2001 मध्ये अब्दुल करीम तेलगीला अटक करण्यात आली, त्यानंतर कोर्टानं साल 2006 मध्ये तेलगीला 30 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र 2017 मध्ये कारागृहातच तेलगीचा मृत्यू झाला. पुढे हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

या खटल्यादरम्यान पुणे मकोक्का कोर्टानं एसआयटीच्या तपासावर अनेक सवाल उचलले होते. जयस्वाल यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या तपासांत अनेक कच्चे दुवे असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं होतं. ही निरीक्षणं रद्द करण्यासाठीच जयस्वाल यांनी साल 2007 मध्ये एक याचिका केली होती. साल 2019 मध्ये हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं जेव्हा जयस्वाल यांच्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून झालेल्या निवडीला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. कोर्टानं ठपका ठेवलेल्या अधिकाऱ्याची इतक्या मोठ्या पदावर नियुक्ती कशी होऊ शकते असा सवाल एका माजी पोलीस अधिकाऱ्यानेच आपल्या याचिकेतून उपस्थित केला होता.

आज हेच सुबोध कुमार जयस्वाल सीबीआयचे संचालक आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयनं थेट राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. याला उत्तर म्हणून की काय राज्य सरकारनंही सायबर क्राईम ब्रांच करवी फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावलंय. महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रीय तपासयंत्रणेत हे समन्स वॉर सुरू असतानाच पंधरा वर्ष जुन्या प्रकरणात राज्य सरकारनं आपलं प्रतिज्ञापत्र सादर करत हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याची कोर्टाकडे विनंती केलीय.

 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोलाABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 08 November 2024Zero Hour Full | दिवाळीनंतरही जोरदार राजकीय फटाके, भुजबळ, मोदी, शाहांनी गाजवला दिवस ABP MajhaPoonam Mahajan Majha Katta : वडील, हत्या आणि राजकारण; 'माझा कट्टा'वर पूनम महाजन यांचे मोठे खुलासे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
Embed widget