Maharashtra News: मुंबई सायबर सेलची सीबीआय संचालकांना नोटीस; 14 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावले
Maharashtra News: मुंबई सायबर सेलने सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना 14 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
Maharashtra News: महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय समोरासमोर येताना पहायला मिळत आहेत. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. सायबर सेलने सीबीआय संचालकाला 14 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ईमेलद्वारे पाठवलेली ही नोटीस अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत पाठवण्यात आली आहे.
काय प्रकरण आहे?
ज्या वेळी महाराष्ट्र CID प्रमुख रश्मी शुक्ला होत्या, त्यावेळी कथितरित्या बदली पोस्टिंगशी संबंधित रेकॉर्डिंग करण्यात आले होते आणि एक अहवाल देखील तयार करण्यात आला होता जो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मीडियासमोर ठेवला होता. त्यावेळी फक्त अहवालाविषयी सांगण्यात आले होते. अहवाल लीक झाला होता. पण रेकॉर्डिंग लीक झाले नव्हते.
या घटनेनंतर मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अज्ञात व्यक्तीविरोधात अधिकृत सीक्रेट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणी झालेली कारवाई नियमानुसार : एनसीबी
क्रूझ ड्रग्ज प्रकरणी कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आरोपांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीने केलेले सर्व आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर छापे टाकण्यात आले आणि कारवाई नियमानुसार होती आणि सर्व आरोपींना चौकशीनंतरच अटक करण्यात आली.
NCB डीडीज ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, नियमानुसार NCB साक्षीदारांसह क्रूझवर पोहोचले होते. आतापर्यंत 9 स्वतंत्र साक्षीदार या खटल्यात सामील झाले आहेत. 2 ऑक्टोबरच्या छाप्यापूर्वी एनसीबी त्यांना ओळखतही नव्हती असं त्यांनी सांगितलं.
क्रूझवरील कारवाईत काही जणांना सोडल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. या आरोपांना उत्तर देताना एनसीबीने सांगितले की, चौकशी केल्यानंतर 6 जणांना सोडून देण्यात आले. तर 8 जणांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलावले जाऊ शकते. नंतर चौकशी आणि खुलाशांच्या आधारे आणखी 10 लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे.