एक्स्प्लोर

Pune School : पुण्यातील शाळा आजपासून सुरू, तब्बल दीड वर्षांनी शाळांची घंटा वाजणार

Maharashtra School Reopen Update : पुणे शहरातील शाळा आजपासून (Pune Pimpri Chinchwad School Open Updates) सुरू होणार आहेत. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे.

Maharashtra School Reopen Update : पुणे शहरातील शाळा आजपासून (Pune Pimpri Chinchwad School Open Updates) सुरू होणार आहेत. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियन्टमुळं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र शाळा खुल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून यासाठी खास तयारी केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व प्रकारच्या खबरदाऱ्या बाळगून शाळा सुरु होणार आहे.  विद्यार्थ्यांसाठी तशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळे वर्ग स्वच्छ केले आहेत. सॅनिटायझरची फवारणी सुद्धा केली गेली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील शाळाही सुरु होणार
पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आजपासून सुरू होणार. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तसं परिपत्रक काढलेलं आहे. कोरोनाच्या ओमयक्रोन व्हेरियंन्टमुळं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र शाळा खुल्या करण्यात येत आहेत. पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेण्याच्या सूचना ही शाळेला देण्यात आल्या आहेत.

काय आहेत शिक्षण विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना? 

  • दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवावे
  • शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे
  • वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी
  • शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे
  • शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितिची पद्धतीचा अवलंब करू नये
  • शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम , खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात
  • ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती नसावी
  • मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये ,आवश्यक नियमांचे पालन करावे
  • क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी
  • शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोनाबाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा
  • शाळांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे 
  • शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये
  • यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी एका वर्गात बसतील.
  • एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशाप्रकारे नियोजन करावे सोबतच विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी
  • शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना  टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे
  • शहरी भागात महापालिका आयुक्त व इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी ,नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी ,आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना कराव्यात
  • या आधीच्या टप्प्यांमध्ये ज्याप्रकारे ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर महापालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायती ,ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आले आहेत.  त्या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी
  • पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल

कल्याण डोंबिवलीतही भरणार 1 ली ते 7 वीचे वर्ग

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील 1ली ते 7 वीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. केडीएमसी प्रशासनाने याबाबतचे नवे आदेश काढत गुरुवार 16 डिसेंबर म्हणजेच आजपासून 1 ली ते 7 वीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांचे आणि अटी शर्थीचे पालन करून या शाळा सुरू करण्याचे निर्देश केडीएमसीने दिले आहेत. 

मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा कालपासून सुरू 

मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा कालपासून सुरू झाल्या. काल दिवसभर यासंदर्भात संभ्रमाचं वातावरण होतं. पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी शाळा सुरू होणारच, कोणताही संभ्रम बाळगू नये असं सांगितल्यानंतर काल शाळा सुरु झाल्या आहेत.  शाळेच्या पहिल्या दिवशी खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षकांनी कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना धडे दिले .शिवाय, इतर पालकांना सुद्धा न घाबरत शाळेत पाठविण्याचा आवाहन केलं आहे. कारण अजूनही 60 ते 65 टक्के पालकांनी शाळेत पाठवण्याबाबत परिपत्रक दिलेले नाही. 

संबंधित बातम्या

Mumbai School : मुंबईत पहिलीपासूनच्या शाळा सुरू, आतापर्यंत फक्त 34 टक्के पालकांचं संमतीपत्र

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Students Fees Waiver: दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा! दहावी- बारावी परीक्षार्थींचे शुल्क पूर्णतः माफ; 305 तालुक्यातील विद्यर्थ्यांना मिळणार लाभ
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा! दहावी- बारावी परीक्षार्थींचे शुल्क पूर्णतः माफ; 305 तालुक्यातील विद्यर्थ्यांना मिळणार लाभ
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Maharashtra blog live updates: भाजपकडून आज देशव्यापी आंदोलनाची हाक; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या वक्तव्याचा करणार निषेध
भाजपकडून आज देशव्यापी आंदोलनाची हाक; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या वक्तव्याचा करणार निषेध
Sudhir Mungantiwar: राजकारणात हे साधनसुचितेचं लक्षण आहे का? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल म्हणाले, सत्तेपासून वंचीत राहिल्याने...
सत्तेपासून वंचीत राहिल्याने असे शब्द निघतात, राजकारणात हे साधनसुचितेचं लक्षण आहे का? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Abhay Oka: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
Manoj Jarange Patil and Sanjay Raut: संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
FDA Actions News: तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
Sachin Pilgaonkar Ashi Hi BanwaBanwi: 'मला ओळखलंत का सासूबाई?'; 'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकर साडी नेसून सुप्रिया पिळगावकरांच्या आईला भेटले, अन् मग...
'मला ओळखलंत का सासूबाई?'; 'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकर साडी नेसून सुप्रिया पिळगावकरांच्या आईला भेटले, अन् मग...
Devdutt Padikkal NZ vs IND : 199 वर देवदत्त पडिक्कल OUT की NOT OUT?, भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पंचांचा वादग्रस्त निर्णय, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
199 वर देवदत्त पडिक्कल OUT की NOT OUT?, भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पंचांचा वादग्रस्त निर्णय, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Sandeep Deshpande on Karjat Torrent Tree cutting: अरे मुख्यमंत्री म्हणजे देव झाले का, ते म्हणतात ते सगळेच बरोबर कसे? कर्जतमधील वृक्षतोडीवरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
अरेSSS मुख्यमंत्री म्हणजे देव झाले का, ते म्हणतात ते सगळेच बरोबर कसे? कर्जतमधील वृक्षतोडीवरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Embed widget