(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai School : मुंबईत पहिलीपासूनच्या शाळा सुरू, आतापर्यंत फक्त 34 टक्के पालकांचं संमतीपत्र
Mumbai School : मुंबईत आज शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट पाहायला मिळाला. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली.
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा अखेरीस आजपासून सुरू झाल्या. काल दिवसभर यासंदर्भात संभ्रमाचं वातावरण होतं. पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी शाळा सुरू होणारच, कोणताही संभ्रम बाळगू नये असं सांगितल्यानंतर आज शाळा सुरु झाल्या आहेत. आतापर्यत मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये फक्त 34 टक्के पालकांनी संमती पत्र दिले आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षकांनी कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना धडे दिले .शिवाय, इतर पालकांना सुद्धा न घाबरत शाळेत पाठविण्याचा आवाहन केलाय. कारण अजूनही 60 ते 65 टक्के पालकांनी शाळेत पाठवण्याबाबत परिपत्रक दिलेले नाही.
मुंबईतील सुरू झालेल्या शाळांची माहिती
- बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पहिली ते सातवीच्या एकूण शाळांची संख्या - 2034
- आज सुरू होणाऱ्या शाळांची संख्या - 1902
- पहिली ते सातवी एकूण विद्यार्थी संख्या - 5 लाख 91 हजार 882
- संमती पत्र प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या - 2 लाख 639 (34%)
- पहिली ते सातवी शाळांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या - 21 हजार 310
- लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या - 20 हजार 212
ग्रामीण भागात पहिली ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या तेव्हा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला होता. मात्र, मुंबई सारख्या मोठ्या शहरात शाळांमध्ये सर्व तयारी जरी झाली असली उत्साह जरी दिसत असला तरी अजून फारसा प्रतिसाद अनेक शाळांमध्ये दिसत नाही.
मुंबईत दीड वर्षानंतर जेव्हा शाळा सुरू झाल्यात तेव्हा त्याच स्वागतच आहे. मात्र, अजूनही मोठा पालक वर्ग शाळेत प्रत्यक्षात आपल्या पाल्याला पाठवायला तयार नाही. मात्र, हळूहळू पालकांच्या मनातील कोरोनाची थोडीफार भीती कमी होईल आणि अधिकाधिक पालक शाळांमध्ये समंती पत्र देऊन मुलांना शाळेत पाठवतील व प्रतिसाद वाढेल ही अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai School Reopen : मुंबईत आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु होणार, महापालिकेचे मुख्याध्यापकांना निर्देश
Pune School Reopen : पुण्यात 16 डिसेंबरपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु होणार