पुढील पाच दिवस महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाची माहिती
Maharashtra Rain Update : आजपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Maharshtra Rain Update : आजपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाच ऑगस्ट ते आठ ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. फक्त मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावरच अतिमुसळधारेचा अंदाज आहे. इतरत्र सर्वत्र चांगला पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्याचा अंदाज आहे.
Gradual increase in the rainfall activity expected over the region . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या pic.twitter.com/exV7WcKDmo
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 3, 2022
विदर्भात सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. विदर्भात आठ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील पुढील पाच दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज कायम आहे. चार ते आठ ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे.
राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी
सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच देशातील विविध भागात देखील दमदार पाऊस पडत असताना दिसत आहे. देशातील कर्नाटक, केरळसह राजधानी दिल्लीत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर राज्यातील मुंबईसह ठाणे, पुणे, सातारा, धुळे, लातूर या परिसारत पाऊस झाला आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती सतर्कता बाळगावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.























