Maharashtra Omicron Cases : गुरुवारी राज्यात ओमायक्रॉनच्या 125 रुग्णांची नोंद, सर्व रुग्ण पुणे शहरातील
Maharashtra Omicron Cases : पुणे मनपा क्षेत्रात 125 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण 2199 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
![Maharashtra Omicron Cases : गुरुवारी राज्यात ओमायक्रॉनच्या 125 रुग्णांची नोंद, सर्व रुग्ण पुणे शहरातील Maharashtra Omicron Cases 125 new cases found in pune Maharashtra Omicron Cases : गुरुवारी राज्यात ओमायक्रॉनच्या 125 रुग्णांची नोंद, सर्व रुग्ण पुणे शहरातील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/d4887ca34c603131cedad2704bf16e2f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत रोज चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय. गुरुवारी राज्यात 125 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली असून हे सर्व रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. त्या आधी बुधवारी 214 ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत आजची संख्या जवळेपास 90 ने कमी आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 2199 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1144 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 865 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद ही पुणे शहरात करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल मुंबईचा क्रमांक लागत असून त्या ठिकाणी 687 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईत गुरुवारी 5,708 रुग्णांची नोंद
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत 5,708 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 440 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत मुंबईत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतील 44 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 5,708 रुग्णांपैकी 550 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4,795 रुग्णांमध्ये कोणताही लक्षणेही नाहीत. आल्याने 38 हजार 093 बेड्सपैकी केवळ 4,857 बेड वापरात आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 96 टक्के इतका आहे.
राज्यातील स्थिती
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 197 नव्या रुग्णांची भर झाली असून 37 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 52, 025 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.92 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 69 लाख 67 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के आहे. सध्या राज्यात 24 लाख 21 हजार 501 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3391 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 27 लाख 45 हजार 348 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)