एक्स्प्लोर

Maharashtra News Live Updates दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांची मोकळ्या जागी धाव

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Live Updates  दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांची मोकळ्या जागी धाव

Background

राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने आजपासून कार्यालयात लोकांची गर्दी होणार आहे. तर, अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामात वेग येण्याची शक्यता आहे. विधिमंडळ अधिवेशनात आजही सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. तर, पुण्यात ओशोंच्या आश्रमासमोर ओशो अनुयायांकडून ओशो कम्युन विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...

दिल्ली

महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून ही सुनावणी विविध कारणांनी लांबणीवर गेली आहे. 

- संसदेत मध्ये कॉग्रेस आदानी प्रकरणावरून आणि भाजप राहुल गांधीनी माफी मागावी म्हणुन आक्रमक असल्यामुळे सभागृहाच कामकाज होत नाहीये. यावर तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे. अशातच अधिवेशन मुदतपुर्वी गुंडाळलं जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. 

मुंबई

विधिमंडळ अधिवेशनात आजही सत्ताधारी-विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या विकासाच्या मुद्यावरून चर्चा सुरू आहे. विधान परिषदेत मुख्यमंत्री या चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे.

- वादग्रस्त क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांना आज सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुंबई पोलिसांनी काल अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक केली आहे. 

- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा झालेला अतोनात नुकसान त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना भरीव अशी मदत झाली पाहिजे आदी मागण्यांसाठी विधानसभेला घेराव आंदोलन होणार आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी बी. व्ही. श्रीनिवास, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, सुनील केदार, विश्वजीत कदम, प्रदेश प्रभारी मिथेंद्र सिंग आदी उपस्थित राहणार आहेत. 

- हसन मुश्रीफ यांची तिन्ही मुलं आणि त्यांचा सीए यांनी ईडीच्या केसमध्ये अटक टाळण्यासाठी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काही महत्वाचे पक्षप्रवेश होणार आहेत. 

- भाजपा आमदार नितेश राणे यांची लव्ह जिहादवर पत्रकार परिषद घेणार आहेत. 

- परप्रांतीय मासेविक्री करणाऱ्यांच्या विरोधात भांडुपमध्ये स्थानिक मासे विक्रेत्यांचे आंदोलन होणार आहे. महापालिकेच्या एस विभागासमोर मासेविक्री करुन करणार निषेध आंदोलन करणार आहेत. 
 

 पुणे 

- ओशोंच्या अनुयायांचे ओशो कम्युन समोर आंदोलन करणार आहेत. ओशो कम्युनची मालकी कोणाची यावरुन वाद सुरु आहे. ओशो कम्युनवर परदेशी लोकांनी ताबा मिळवलाय, असा अनुयायांचा आरोप आरोप आहे. न्यायालयात देखील हा वाद सुरु आहे. आज ओशोंचा संबोधी दिवस आहे.

नाशिक 

-  सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने शेतकऱ्यांना दिलासा नाशिक जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आजपासून सुरू होणार आहेत. अधिकारी कर्मचारी आजपासून बांधावर जाणार आहेत.

-  गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आनंदाच्या शिधाचे वाटप केले जाणार असून पुरवठा विभागाने दिलेल्या सूचनेनूसार आनंद शिधाचे स्टिकर रेशन दुकांनामध्ये आज लावले जाणार आहेत. 

अहमदनगर 

सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने आज सरकारी कार्यालयात नागरिकांची विविध कामांसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

 जळगाव

 महापालिकेची आज महासभा होणार आहे. पालिकेत सध्या महापौर ठाकरे गटाचे आहे तर बहुमत भाजप शिंदे गटाचे असल्याने काही ठरावावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

-  जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हलविल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.

धाराशिव

-  उद्धव ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत.  सकाळी तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

22:30 PM (IST)  •  21 Mar 2023

Delhi Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांची मोकळ्या जागी धाव

Delhi Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांनी तातडीने मोकळ्या जागी धाव घेतली. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

22:10 PM (IST)  •  21 Mar 2023

Mumbai News : खड्डेमुक्त रस्ते ठेवण्यासाठी रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट आणि रॅपिड अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा महापालिका करणार वापर

मुंबईच्या रस्त्यावर दरवर्षीच्या पावसाळी पाण्यामुळे निर्माण होणारी खड्ड्यांची समस्या पाहता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने व जलदगतीने हे खड्डे भरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने नियोजनाला सुरूवात केली आहे. येत्या पावसाळ्याचा कालावधी पाहता रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी आणि खराब भाग दुरूस्तीसाठी महानगरपालिकेने पावसाळा पूर्व कामांमध्ये रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट (एम ६०) आणि रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन केले आहे. 
 
19:18 PM (IST)  •  21 Mar 2023

Solapur News : सांगोला तालुक्यातील घेरडी शाळेतील पोषण आहारात तांदळात प्लास्टिक सदृश्य पदार्थाची भेसळ? तातडीने  तपासणी करण्याची मागणी

Solapur News :  सांगोला तालुक्यातील घेरडी शाळेतील पोषण आहारात तांदळात प्लास्टिक सदृश्य पदार्थाची भेसळ असल्याचा दावा करण्यात आला आहे. किलोभर तांदळात जवळपास मूठभर हा पदार्थ सापडत असल्याची तक्रार , पोषण आहारात भेसळीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने तातडीने  तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

17:04 PM (IST)  •  21 Mar 2023

Mumbai News : अमृता फडणवीसांकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी

अमृता फडणवीसांकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी

अनिक्षा जयसिंघानीला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी तर अनिल आणि निर्मल जयसिंघानीला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

अनिक्षा जयसिंघानी, तिचे वडील अनिल जयसिंघानी आणि चुलत काका निर्मल जयसिंघानी यांना याप्रकरणी अटक

अनिक्षा तपासांत सहकार्य करत नाही म्हणून कोठडी वाढवली, तर अन्य दोघांना पहिलीच पोलीस कोठडी

16:41 PM (IST)  •  21 Mar 2023

तळकोकणात गॅस दरवाढी विरोधात उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या घरगुती गॅस दरवाढी विरोधात सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे गॅस आणून दगडी चुलीवर भाकरी बनवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्र तसेच राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget