एक्स्प्लोर

Shirdi Sai Mandir :  साईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीत अखेर साईभक्तांची पास रांगेतून मुक्ती; आता पासशिवाय दर्शन रांगेत प्रवेश

साई भाविकांची (Shirdi News) होणारी ससेहोलपट आता थांबली असून वेळेची देखील आता बचत होणार आहे.

Shirdi News : शिर्डीत साई दर्शनासाठी (Shirdi Sai Baba Darshan) सक्तीचा असलेला बायोमेट्रिक पास आजपासून बंद करण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळालाय. भाविकांची होणारी ससेहोलपट आता थांबली असून वेळेची देखील आता बचत होणार आहे. यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. घोषणा करूनही सकाळी पास सक्ती सुरूच होती,  मात्र एबीपी माझाने वृत्त दाखवताच पास मुक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलीय. 

...आणि दर्शनपास काउंटर बंद करण्यात आले.

शिर्डीत साईंच्या‌ दर्शनासाठी बायोमेट्रिक अर्थात ऑफलाईन पास सक्तीचा असल्याने दोन वेळा रांगेत उभ राहावे लागत होते. पास घेताना वृद्ध , लहान मुले यांचे मोठे हाल होत होेते. साईबाबा संस्थानने भाविकांना दिलासा देण्यासाठी बायोमेट्रिक पासची अट हटवल्याने भाविकांचा मनस्ताप कमी झाला आहे. त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान आज पासुन दर्शनपास बंदचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देखील आज सकाळी विना पास सोडत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. प्रशासनाचा असमन्वय त्यामुळे समोर आलाय. एबीपी माझा च्या बातमीनंतर प्रशासन जागे झाले आणि दर्शनपास काउंटर बंद करण्यात आले.

रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होणार

साईबाबांच्या दर्शनासाठी बायोमेट्रिक दर्शन पास बंद करण्याचा निर्णय साई संस्थानचे अध्यक्ष व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आला होता. कोरोना महामारीची बंदी हटविण्यात आल्याने यावेळी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यासाठी 95 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील 21 लाख रुपये ग्रामस्थांच्या प्रवास समितीच्या कार्यक्रमासाठी दिले जातील. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे भक्तमंडळी अस्वस्थ होते. शिर्डीतील अभिषेक आणि सत्यनारायण विधी कोरोना निर्बंधामुळे बंद करण्यात आली होती.

अभिषेक, सत्यनारायण विधी सुरू

1 एप्रिलपासून अभिषेक, सत्यनारायण विधी सुरू होणार आहेत. मंदिर परिसरात लावण्यात आलेले बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. यासोबतच भक्त निवाससमोरील बाग आणि ग्रामदेवतेचे दर्शनही सुरू होणार आहे. शिर्डीतून जाणाऱ्या अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला साई संस्थान महाद्वार बांधणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेतली जाणार आहे. शिर्डीत समाजकंटकांकडून भाविकांचा छळ होत असल्याची तक्रार संस्थेला प्राप्त झाली असून, ती सोडवण्यासाठी संस्था पोलिसांची मदत घेणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
Gokul Election: गोकुळमध्ये गुलाल कुणाला? सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
गोकुळमध्ये गुलाल कुणाला? सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Nagpur Crime: चंद्रपुरात मैत्रिणीला संपवलं, मग मृतदेह नागपूरात आणून रिकाम्या घरात पुरला, वर फरशीही बसवली; पण...; थरारक घटनेचा उलगडा करत आरोपी शिक्षकाला अटक
चंद्रपुरात मैत्रिणीला संपवलं, मग मृतदेह नागपूरात आणून रिकाम्या घरात पुरला, वर फरशीही बसवली; पण...; थरारक घटनेचा उलगडा करत आरोपी शिक्षकाला अटक
Kolhapur Gokul Election 2026 Results: गोकुळच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, आज सत्तेचा फैसला होणार; महायुती की महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?
गोकुळच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, आज सत्तेचा फैसला होणार; महायुती की महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळमध्ये गुलाल कुणाला? सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
गोकुळमध्ये गुलाल कुणाला? सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Tiger Shroff Car Attack: अगदी जवळून सात राऊंड फायर झाले, तरीही टायगर श्रॉफ कसा वाचला? दोन महत्त्वाची कारणं, नेमकं काय घडलं?
अगदी जवळून सात राऊंड फायर झाले, तरीही टायगर श्रॉफ कसा वाचला? दोन महत्त्वाची कारणं, नेमकं काय घडलं?
Kolhapur Gokul Election 2026 Results: गोकुळच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, आज सत्तेचा फैसला होणार; महायुती की महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?
गोकुळच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, आज सत्तेचा फैसला होणार; महायुती की महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफच्या गाडीवर रात्री हल्ला; घटनेनंतरचा पहिला फोटो समोर, छाती अन् हातावर पट्टी, एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
टायगर श्रॉफच्या गाडीवर रात्री हल्ला; घटनेनंतरचा पहिला फोटो समोर, छाती अन् हातावर पट्टी, एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
Horoscope Today 19 October 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
Tiger Shroff Car Firing Marathi News: टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले; प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व!
टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले; प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व!
Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
Amravati Crime: चक्क डॉक्टरकडून साडेतीन लाखांमध्ये नवजात बाळाची विक्री; शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, डॉक्टर महिलेसह पती अन् प्रियकरावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
अमरावतीत डॉक्टरकडून चक्क साडेतीन लाखांमध्ये नवजात बाळाची विक्री; शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, डॉक्टर महिलेसह पती अन् प्रियकरावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
Embed widget