एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा आज निकाल
विधानपरिषद निवडणूक निकाल: रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा निकाल आज जाहीर होत आहे.
विधानपरिषद निवडणूक निकाल: मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे. लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर गेली आहे.
याव्यतिरिक्त रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा निकाल आज जाहीर होईल.
या सर्व मतदारसंघात सोमवारी 21 मे रोजी मतदान झालं.
आज निकाल
दरम्यान, आज सुरुवातीला नोटा आणि अवैध मतं बाजूला काढली जातील, त्यानंतर वैध मतांचा कोटा ठरवून मतमोजणीला सुरुवात होईल. नाशकात शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे अशी लढत पहायला मिळाली. इथं भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत 99.57 टक्के मतदानाची नोंद झाली. 940 पैकी 938 जणांनी मतदान केलं. कर्जत आणि पनवेलमधील प्रत्येकी एका मतदाराची मतदानासाठी अनुपस्थिती होती. दोन्ही शेकापचे लोकप्रतिनिधी आहेत.
नाशिकमध्ये 644 जणांनी मतदानाचा हक्क बजवल्यामुळे 100 टक्के मतदान झालं.
उस्मानाबाद बीड लातूर मतदारसंघात 99.9 % मतदान झालं. एक हजार पाच मतदारापैकी एक हजार चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उस्मानाबाद (291) आणि लातूर (353) मध्ये शंभर टक्के मतदान झालं असून बीडमध्ये (360) एका मतदाराने आपला हक्क बजावला नाही.
परभणी हिंगोलीतील 501 पैकी 499 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदाराची आकडेवारी 99.60 टक्के झाली आहे.
अमरावतीत 489 पैकी 488 सदस्यांनी मतदान केलं. अमरावतीत मतदानाची आतापर्यंतची आकडेवारी 99.80 टक्के इतकी आहे.
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधील जागेसाठी 99.72 % मतदान झालं. 1059 मतदारांपैकी 1056 जणांनी मताधिकार बजावला.
बीडमध्ये प्रतिष्ठेची लढत
लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे.
या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.
राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली.
त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला.
उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद : मतमोजणी पुढे ढकलली!
नाशिक
नाशिकमध्येही विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली आहे. इथे शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्यात सामना होत आहे.
मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतला वचपा काढण्यासाठी इथे भाजप थेट राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय.
कोकणात राणेंचा तटकरेंना पाठिंबा
कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना, तर शिवसेनेने राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे.
नारायण राणे यांनी शिवसेनेला विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.
अमरावती
अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल मधोगरिया यांच्यात सरळ लढत होत आहे. त्याकडेही सर्वांचं लक्ष आहे.
विधानपरिषद निवडणूक 2018 : कोणाविरुद्ध कोण?
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) विरुद्ध राजीव साबळे (शिवसेना)
नाशिक - नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)
परभणी-हिंगोली - विप्लव बजोरिया (शिवसेना) विरुद्ध सुरेश देशमुख (काँग्रेस)
उस्मानाबाद-लातूर-बीड - सुरेश धस (भाजप) विरुद्ध अशोक जगदाळे (अपक्ष) - राष्ट्रवादीचा पाठिंबा
अमरावती - प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध अनिल मधोगरिया (काँग्रेस)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली - इंद्रकुमार सराफ (काँग्रेस) विरुद्ध रामदास अंबटकर (भाजप)
या आमदारांचा कार्यकाळ संपणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक)
राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली)
काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड)
भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती)
भाजपचे मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली)
संबंधित बातम्या
उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद : मतमोजणी पुढे ढकलली!
पाच दिवसात राष्ट्रवादी का सोडली? रमेश कराड म्हणतात...
शंभर ते दीडशे मतांच्या फरकाने निवडून येणार : सुरेश धस
बीड-उस्मानाबाद-लातूरमध्ये एका मताची किंमत पाच लाख रुपये?
विधानपरिषद निवडणुकीचं राज्यातलं चित्र, कुणाचं संख्याबळ किती?
कोकण विधानपरिषदेत शिवसेना विरुद्ध राणे विरुद्ध तटकरे
रमेश कराड तोडपाणी करण्यात कमी पडले असावे : सुरेश धस
पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement