एक्स्प्लोर

weekly recap : आदित्य एल1 चे प्रक्षेपण, इंडिया आघाडीची बैठक ते जालना मराठा आंदोलन; वाचा कसा होता आठवडा?

Weekly Recap : प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आपण आठवडाभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेत असतो. पाहुयात चालु आठवड्यातील घटनांचा आढावा.

Weekly Recap : प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आपण आठवडाभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेत असतो. या चालू आठवड्यात म्हणजे 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर यादरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. या आठवड्यात भाजपविरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक झाली. त्याचबरोबर आदित्य एल1 चं यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. तसेच जालना मराठा आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल तसेच अदानी ग्रुपवर झालेले आरोप  यासह विविध घडामोडींचा घेतलेला आढावा. 

Aditya-L1 Mission : शाब्बास! आदित्य एल1 चे प्रक्षेपण, भारताचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु 

श्रीहरिकोटा : आदित्य एल1 (Aditya L1) चे यशस्वी प्रक्षेपण झाले असल्याची घोषणा इस्रो (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ यांनी केली आहे. त्यांनी यावेळी इस्रोच्या शास्रज्ञांचे देखील अभिनंदन केले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. त्यामुळे आता इस्रोला सूर्याचा अभ्यास करणं हे शक्य होणार आहे. (वाचा सविस्तर)

जालना येथील घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. तर या सर्व घटनेला सरकार जबाबदार असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. हे गृहविभागाचे अपयश असून, फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे. (वाचा सविस्तर)

यावर्षीचा ऑगस्ट महिना ठरला इतिहासातील सर्वात कमी पावसाचा

देशाच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. तर अनेक ठिकाणी अद्यापही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट (August) महिन्यात पावसानं चांगलीच ओढ दिल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, यावर्षीचा ऑगस्ट महिना हा इतिहासातील सर्वात कमी पावसाच्या ऑगस्ट महिन्यांपैकी एक ठरला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी (Anupam Kashyapi) यांनी दिली. तर महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात उणे 12 टक्के पावसाची नोंद जाली आहे. (वाचा सविस्तर)

इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना

विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या I.N.D.I.A. ची बैठक मुंबईत सुरू आहे. सर्व घटकपक्षांची बैठक सध्या सुरू आहे. या बैठीकत इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.  समन्वय समितीत 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे. इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.  तसेच  इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. (वाचा सविस्तर)

'इंडिया' आघाडीच्या मुंबईतील बैठकीत रणनिती ठरली

भाजप आणि एनडीएच्या विरोधात स्थापन झालेल्या विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची मुंबईतील बैठक पार पडली. मुंबईतील बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्यासह महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. इंडिया आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील बैठकीत आघाडीने जागा वाटपावरही निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीचे जागा वाटप राज्यनिहाय होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव मंजूर झाला. (वाचा सविस्तर)

वन नेशन वन इलेक्शनसाठी समितीची स्थापना, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अध्यक्ष

एक देश एक निवडणुकीसाठी (one nation, one election) समितीची स्थापना करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने  ही माहिती दिली आहे.  एक देश एक निवडणूक घेता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. (वाचा सविस्तर)

जालना: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज (Jalna Police LathiCharge) केला. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (वाचा सविस्तर)

ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांना झटका; दुधाच्या दरांत प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ

गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आधीपासूनच महागाईनं (Inflation) हैराण झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता ऐन सणासुदीच्या काळात मोठा धक्का बसणार आहे. मुंबईकरांना (Mumbai News) महागाईचा झटका बसणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात मुंबईत म्हशीचं दूध (Buffalo Milk Price) दोन रुपयांनी महागलं आहे. मुंबई दूध उत्पादक संघानं 1 सप्टेंबरपासून मुंबईत म्हशीच्या दुधाचे घाऊक दर प्रतिलिटर 85 रुपयांवरून 87 रुपये प्रतिलिटर होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार, आजपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. (वाचा सविस्तर)

अदानी ग्रुपवर आता OCCRP चे नव्याने आरोप; मॉरिशस कनेक्शनद्वारे शेअरची भाववाढ केल्याचा दावा

ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) ने भारतातील अदानी ग्रुपला पुन्हा लक्ष्य केलं आहे. अदानी समुहाने (Adani Group) आपल्याच शेअर्समध्ये मॉरिशस कनेक्शन वापरुन अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करुन कृत्रिमरित्या आपल्या शेअर्सचे भाव वाढवल्याचा ओसीसीआरपी चा आरोप आहे. आदानी समुहाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. (वाचा सविस्तर)

तुरीचे दर 12 हजारांवर तर तूरडाळ 175 रुपये किलो

 गेल्या वर्षी झालेली अनियमित पाऊसमान आणि यावर्षी दिलेली पावसाने ओढ याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर झाला आहे. यामुळे सर्वच खाद्य वस्तूंची भाव वाढताना दिसत आहेत. डाळीने तर रोज दराचा उच्चांक गाठण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. (वाचा सविस्तर)

जेवणाची एक प्लेट साडेचार हजार रुपयांची, 45 हजारांच्या 65 खुर्च्या', इंडिया आघाडीच्या बैठकीचा उदय सामंतांनी मांडला खर्च

 मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. गुरुवार (31 ऑगस्ट) आणि शुक्रवार (1 सप्टेंबर) रोजी मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीच्या खर्चाची उजळणी मंत्री उदय सामंत यांनी केली. मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये इंडियाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर याच बैठकीचा समाचार सध्या शिंदे गटाकडून घेण्यात येत आहे. (वाचा सविस्तर)

शरद पवार यांचं वय झालं आहे, त्यांनी आता निवृत्त व्हावं : शरद पवार

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे व्यस्थापकीय संचालक सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांनी बुधवारी (30 ऑगस्ट) रोजी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि त्यांचे जिवलग मित्र शरद पवार (Sharad Pawar) यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, "शरद पवार यांचं वय झालं आहे, त्यांनी आता निवृत्त व्हावं." सायरस पुनावाला हे यंदाच्या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या मिस वर्ल्ड 2023 या कार्यक्रमाशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात त्यांना अजित पवारांच्या बंडानंतर भाजप-शिवसेनेच्या सरकारविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. (वाचा सविस्तर)

अजित पवारांना शिंदे-फडणवीसांचा धक्का? साखर कारखान्यांबाबतचा शासन निर्णय अखेर मागे

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चांगलाच धक्का दिल्याचं बोललं जात आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साखर कारखान्यांबाबत काढलेल्या शासननिर्णय आठच दिवसांत मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ आणि शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलासा मिळत आहे. (वाचा सविस्तर)

 घरगुती सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी होणार

देशभरातील महिलांना मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या एक दिवस आधी मोठं गिफ्ट दिलं आहे. उद्यापासून म्हणजे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती (LPG Gas Price) या 200 रुपयांनी कमी होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur On LPG Cylinder Price) यांनी केली आहे. (वाचा सविस्तर)

मंत्रालयात शेतकऱ्यांचे आंदोलन, अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक

अप्पर वर्धा (Wardha) प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात आक्रमक भूमिका घेतली आहे. अप्पर वर्धा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. तर या आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मंत्रालयात उपस्थित असलेल्या पोलिसांकडून करण्यात आला. आम्ही अनेक दिवसांपासून निवदेन देत असून आमच्या मागण्या अजून मान्य होत नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, यावेळी मंत्रालयामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काही दिवसांत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. (वाचा सविस्तर)

विदर्भाच्या आदिवासी बाहुल भागातील 15 टक्के विद्यार्थ्यांमध्ये मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे

नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयाने (Government Dental College Nagpur) केलेल्या एका सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विदर्भाच्या (Vidarbha) आदिवासी बाहुल भागातील 15 टक्के आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मुखपूर्व कर्करोगाचे (Cancer) लक्षणे आढळले आहेत. हे विद्यार्थी गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील असून 7 ते 21 वयोगटातील शाळा, महाविद्यालय आणि आश्रम शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत. (वाचा सविस्तर)

लातूरच्या अविष्कार कासलेची कोटामध्ये आत्महत्या, कोटाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोचिंग क्लासमधील परीक्षांवर दोन महिन्यांसाठी बंदी

राजस्थानच्या कोटामध्ये देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. रविवारी दुपारी कोटामध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यने आत्महत्या केली आहे.लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील आविष्कार संभाजी कासले  (17 वर्षे)  हा विद्यार्थी कोटा येथे शिक्षण घेत होता. रविवारी अविष्कारने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या  केली आहे. घटनेची माहिती अहमदपूर तालुक्यातील उजना या गावात कळताच सर्वांना धक्का बसला आहे. (वाचा सविस्तर)

बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, लातूर विभागाची बाजी

बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC Board Re-examination) जाहीर झाला आहे. बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज, 28 ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना ‌www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. निकालात विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन देण्याच आले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. (वाचा सविस्तर)

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! गणपतीत पुणे मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार

 पुण्यातील (Pune) गणेशोत्सव मंडळांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बैठक घेतली. यावेळी मिरवणुका वेळेत पार पाडण्याची विनंती गणपती मंडळांना केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रो (Metro) ही रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. (वाचा सविस्तर)

 Jio AirFibre बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा; 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार लॉन्च

जियो युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून जियोच्या एअर फायबरची आतुरतेनं वाट पाहत होते. आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी जियो एअर फायबरबाबत मोठी घोषणा केली आहे. जियोच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे. गणेश चतुर्थी म्हणजेच, 19 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घर आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. जियो एअर फायबरच्या लँडिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ होण्याचीही शक्यता आहे. (वाचा सविस्तर)

भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!

जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने दणदणीत कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. त्याने 88.17 मीटरपर्यंत भालाफेक केली. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले. (वाचा सविस्तर)

पावसामुळे रंगाचा बेरंग, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना पावसामुळे रद्द झाला आहे. आशिया चषकातील भारताचा पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला आहे. 10 वाजेपर्यंत पंचांनी पाऊस थांबण्याची वाट पाहिली. पण पावसाने विश्रांती घेतली नाही. त्यामुळे अखेर पंचांनी सामना रद्द म्हणून जाहीर केले. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण दिले. पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तान संघाने नेपाळचा पराभव करत दोन गुणांची कमाई केली होती. पाकिस्तान संघाने तीन गुणांसह आता सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. (वाचा सविस्तर)

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget