लातूरच्या अविष्कार कासलेची कोटामध्ये आत्महत्या, कोटाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोचिंग क्लासमधील परीक्षांवर दोन महिन्यांसाठी बंदी
Kota Exam: राजस्थानच्या कोटामध्ये परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. रविवारी पाच तासात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यातील एक विद्यार्थी लातूरच होता.
राजस्थान: राजस्थानच्या कोटामध्ये देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. रविवारी दुपारी कोटामध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यने आत्महत्या केली आहे.लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील आविष्कार संभाजी कासले (17 वर्षे) हा विद्यार्थी कोटा येथे शिक्षण घेत होता. रविवारी अविष्कारने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती अहमदपूर तालुक्यातील उजना या गावात कळताच सर्वांना धक्का बसला आहे.
अविष्काराचे आई वडील हे दोघेही शिक्षक आहेत. अहमदपूरमध्ये ते राहतात.त्यांचा मोठा मुलगा आयआयटी हैदराबाद येथे शिक्षण घेतो.मोठ्या मुलाचे कोटामधून शिक्षण पूर्ण झालं होतं. त्याचे यश बघून अविष्कारलाही कोटा येथे शिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं. नेमके या आत्महत्या मागची काय कारण आहेत हे अजून समोर आलं नाही. अविष्कारने दुपारी 3.15 च्या सुमारास जवाहरनगरच्या कोचिंग क्लासच्या सहाव्या मजल्यवरुन उडी मारून आत्महत्या केली.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी सोडला जीव
अविष्कारने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच कोचिंग क्लासच्या तिसऱ्या मजल्यावर परीक्षा दिली होती. कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्यांनी अविष्कारला तातडीने रुग्णवाहिका बोलावली मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वी अविष्कारने रस्त्यात आपला जीव सोडला. आत्महत्या केल्याची माहिती कळतच सर्व नातेवाईकांना धक्का बसला आहे. अविष्कारच्या आत्महत्येची माहिती अद्याप आविष्कारच्या आईला देण्यातच आली नाही. मृतदेह घेऊन येण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. आज संध्याकाळी किंवा उशिरा मृतदेह उजना या मूळ गावी घेऊन येण्यात येणार आहे.
कोटात एकाच दिवशी नीटची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
अविष्कारच्या आत्महत्येनंतर चार तासानतर कोटामध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आदर्श राज (18 वर्षे) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. संध्याकाळी सात वाजता कुन्हाडी येथील आपल्या घरात फाशी घेत आत्महत्या केली. आदर्शची बहिण आणि चुलत भाऊ संध्याकाळी साडेसात वाजता फ्लॅटवर पोहचले तर दरवाजा आतून बंद होता. जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला त्यावेळी लटकलेल्या अवस्थेत होत्या. आदर्शला लगेच खाली उतरवण्यात आले परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याने प्राण सोडले.
कोटाच्या सर्व कोचिंग क्लासेसमधील परीक्षा दोन महिन्यांसाठी बंद
कोटामध्ये देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. पण आता कोटाच्या सर्व कोचिंग क्लासेसमधील परीक्षा दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय. काल लातूरच्या विद्यार्थ्याने कोटामध्ये आत्महत्या केली. कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI