एक्स्प्लोर

One Nation One Election: वन नेशन वन इलेक्शनसाठी समितीची स्थापना, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अध्यक्ष

एक देश एक निवडणूक घेता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

 नवी दिल्ली एक देश एक निवडणुकीसाठी (one nation, one election) समितीची स्थापना करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने  ही माहिती दिली आहे.  एक देश एक निवडणूक घेता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

2016 नंतर आत्तापर्यंत लॉ मिनिस्ट्री, निती आयोग आतापर्यंत तीन कमिटींनी एक देश एक निवडणुकांसदर्भात आपले मत मांडले आहे. आता ही चौथी समिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. एक देश एक निवडणूक घेता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लगेच या निर्णयासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे असा तर्क सध्या लावणे कठीण आहे. परंतु एक देश एक निवडणूक समितीच्या माध्यमातून चर्चेचा रोख वळवण्यात मोदी सरकार यशस्वी झाले असे म्हणता येईल. कारण पुढचे काही दिवस या संदर्भात चर्चा होत राहणार आहे.

सध्या मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. आज लोगोचे अनावरण होणार आहे. काल पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी अदानींवर आरोप केले आहेत. आरोप प्रत्यारोप सुरू असताना या बातमीने सर्वांचे लक्ष वळवण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. 2016 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात एक देश एक निवडणुकांसदर्भात उल्लेख केला होता. तसेच वेगवगेळ्या व्यासपीठावरून देखील या संदर्भात त्यांनी भाष्य केले आहे.

एकत्र निवडणुका खरंच शक्य आहेत? 

सगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका लोकसभेसोबत हे आज काहीसं अकल्पनीय वाटत असेलही. पण देशात स्वातंत्र्यानंतरची 20 वर्षे म्हणजे जवळपास 1967 पर्यंत अशाच पद्धतीने निवडणुका होत होत्या. विविध कारणांमुळे काही राज्य सरकारे बरखास्त झाली आणि नंतर ही साखळी तुटत गेली. आज ही कल्पना जोरात रेटण्यात भाजप अग्रेसर आहे. कारण, देशपातळीवर एक प्रभावी नेता असल्याने राज्यातही आपल्याला त्याचा फायदा मिळेल, असा त्यांचा राजकीय हेतू आहे. पण निवडणुकांचा हा विस्कटलेला पट पुन्हा असा सरळं करणं इतकं सोपं नाही. एकत्रित निवडणुका झाल्या तर प्रचारात राष्ट्रीय मुद्देच अधिक चर्चिले जाऊन राज्यातल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल हा एक प्रमुख आक्षेप आहे. शिवाय अल्पमतातलं सरकार असल्यानं विधानसभा मध्येच बरखास्त करावी लागली तर अशा परिस्थितीत काय करणार असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे कल्पना चांगली असली तरी ती व्यवहार्य नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. निवडणुका सुधारणांचा भाग म्हणून भाजपने एकत्रित निवडणुकांचा मुद्दा जाहीरनाम्यातही समाविष्ट केलेला आहे. पण यावर राजकीय एकी घडवून आणणं हे दिव्य असेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Embed widget