(Source: ECI/ABP News/ABP Majha)
I.N.D.I.A. : इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना; शरद पवार, संजय राऊतांसह13 जणांचा समावेश
इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
मुंबई: विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या I.N.D.I.A. ची बैठक मुंबईत सुरू आहे. सर्व घटकपक्षांची बैठक सध्या सुरू आहे. या बैठीकत इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समन्वय समितीत 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे. इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
पक्षाचे वरिष्ठ नेते हे या समन्वय समितीच्या माहितीनुसार पुढील काम करणार आहेत. ही समन्वय समिती देशभरात फिरणार असून पुढील अजेंडा ठरणार आहे. या समितीमध्ये महाराष्ट्रातून शरद पवार आणि संजय राऊत असणार आहे.
समन्वय कमिटीत 13 जणांचा समावेश
- केसी वेणूगोपाल
- शरद पवार
- एम के स्टॅलिन
- संजय राऊत
- तेजस्वी यादव
- अभिषेक बॅनर्जी
- राघव चड्डा
- जावेद खान
- ललन सिंग
- हेमंत सोरेन
- मेहबूबा मुफ्ती
- डी राजा
- ओमर अब्दुला यांच्या समावेश
इंडिया आघाडीच्या बैठकीत ठराव देखील मंजूर करण्यात आले आहे. ते ठराव पुढीलप्रमाणे
- जुडेगा भारत, जितेगा इंडिया
- शक्य तिथे लोकसभा निवडणुका एकत्र लढणार
- जागावाटपासंदर्भात लवकरात लवकर सुरूवात करून प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार
- येत्या काही दिवसांत एकत्र रॅलीला सुरूवात करणार
I.N.D.I.A.आघाडीच्या बैठकीचा साधारण अजेंडा समन्वय समितीची स्थापना करणे होते. या आघाडीच्या मुख्य 13 प्रवक्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सोशल माध्यमांवरच्या लढाईत इंडिया आघाडी एकजूट दाखवणार आहे. प्रवक्त्यांमध्ये समन्वयासाठी सुद्धा एक विशेष समिती बनवली जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. सर्व घटकपक्षांची बैठक सध्या सुरू आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा अध्यक्ष कोण असावा, आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कुणाला प्रोजेक्ट केलं जावं, यावर चर्चा होत आहे. इंडिया बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. भाजप सूडबुद्धीनं काम करतंय, ते केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करतायेत, आपल्याला अटकेची तयारी करावी लागेल असं खरगे म्हणाले.
हे ही वाचा :