एक्स्प्लोर

Aditya-L1 Mission : शाब्बास! आदित्य एल1 चे प्रक्षेपण, भारताचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु 

Aditya-L1 Mission: श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून इस्रोचे आदित्य एल 1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. 

श्रीहरिकोटा :  भारताच्या सूर्य मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya L1) यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांनी बरीच गर्दी जमली होती. इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे. 

पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होणार प्रवास

आदित्य यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल.

चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल. हा संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पण पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे. 

असा करणार सूर्याचा अभ्यास

आदित्य एल1 मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील. विशेष म्हणजे ग्रहणकाळात देखील सूर्याचा अभ्यास करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचं इस्रोच्या शास्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सूर्य हा एक तारा आहे. त्यामुळे सूर्यावर सतत काही ना काही स्फोट होत असतात. पण या कोणत्याही स्फोटांचा परिणाम या यानावर होणार नाही. सूर्यामधील अनेक रहस्यांचा उलगडा करण्यास हे यान इस्रोला मदत करेल. 

चांद्रयान 3 च्या यशानंतर मिशन आदित्य 

दहा दिवसांपूर्वीच भारताने चंद्रावर इतिहास रचला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चंद्राच्या यशस्वी मोहीमेनंतर आता इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. इस्रोची ही पहिलीच सूर्य मोहीम असून या मोहीमेकडे जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. पण आता या मोहिमेचं देखील यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. तसेच या यानाचा पुढचा प्रवास देखील सुलभ होण्यासाठी सध्या भारतीय प्रार्थना करत आहेत. तसेच हा प्रवास लवकरच यशस्वीरित्या पूर्ण होणार असल्याचा विश्वास देखील इस्रोच्या शास्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा : 

Aditya-L1 Solar Mission : सुरुवातीला होणार होता फक्त 800 किमीचा प्रवास, कशी सुरु झाली मिशन आदित्यची गोष्ट?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Bihar Politics 2026: नितीश कुमारला हटवण्यासाठी पगडी घालणारे भाजपचे सम्राट होणार मुख्यमंत्री? बिहारची सूत्रे कोणाकडे?
नितीश कुमारला हटवण्यासाठी पगडी घालणारे भाजपचे सम्राट होणार मुख्यमंत्री? बिहारची सूत्रे कोणाकडे?
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका

व्हिडीओ

Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा
Kolhapur Babasaheb Ambedkar Statue : बाबासाहेब हयात असताना कोल्हापुरात उभरलेला पुतळा Special Report
Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
Summer Heat wave: राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
Embed widget