Maharashtra News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, आजचे सर्व कार्यक्रम रद्द
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Background
मुंबई : राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सत्ताधारी महायुतीवर सडकून टीका केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरात महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रसार आणि प्रचार कार्यक्रमला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. दुपारी 12.30 सोलापुरातील होम मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अक्कलकोटला जाणार आहेत.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, आजचे सर्व कार्यक्रम रद्द
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तब्येत बरी नसल्याने कारणाने मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. सोलापूर दौरा आणि राज्यमंत्री मंडळाची बैठकही रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेय
Mhada Lottery: थोड्याच वेळात म्हाडाच्या घरांची सोडत निघणार
Mhada Lottory: थोड्याच वेळात म्हाडाच्या घरांची सोडत निघणार आहे. मुंबईतील 2030 घरांसाठी मुख्यमंत्री यांच्या हस्ते निघणार सोडत निघणार आहे. या सोडतीसाठी 1 लाख 5 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन उपस्थित असणार आहेत. तर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत.






















