Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 09 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 09 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
जम्मू काश्मीरचे भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र रैना यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिला पदाचा राजीनामा. रैना यांचा निवडणुकीतही झालाय पराभव
हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार, प्रत्येक जातीच्या, वर्गाच्या लोकांनी भाजपला मतदान केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले हरियाणाच्या मतदारांचे आभार.
देशात एवढ्या निवडणुका झाल्या, पण कुठेही काँग्रेसला दुसरी संधी मिळाली नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका, एकदा लोकांनी काँग्रेसला हाकलल्यानंतर 'नो एन्ट्री'चा बोर्ड लावला, मोदींचा हल्लाबोल.
काँग्रेसने शेतकरी, दलित, ओबीसींना भडकवण्याचा प्रयत्न केला ,पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर आरोप, भारतीय सेनेबाबतही काँग्रेसने अपप्रचार केला, मोदींचं वक्तव्य.
काँग्रेसकडून दलित, मागासांवर सर्वाधिक अन्याय , काँग्रेस दलित, मागास, आदिवासींचा द्वेष करते, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल..
काँग्रेस नेते राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यावर हरियाणाने पहिली सलामी दिली, दुसरी सलामी महाराष्ट्र देईल, हरियाणा विधानसभेच्या निकालावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका.
हरियाणा निवडणूकीसारखा परिणाम महाराष्ट्रत होणार नाही. फडणवीसांनी केलेलं भविष्य कधी खरे होत नाही. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
.