एक्स्प्लोर

Model Chaiwali Viral: डॉली चायवाल्याला 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%

Model Chaiwali: डॉली चायवाला आणि वडापाव गर्लला टक्कर देण्यासाठी 'मॉडेल चायवाली' मार्केटमध्ये आली आहे. लखनौमध्ये चहा विकणाऱ्या या स्टायलिश मॉडेलचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Model Chaiwali Viral Video: डॉली चायवाला (Dolly Chai Wala) आणि व्हायरल वडापाव गर्ल (Viral Vada Pav Girl) सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. डॉली चायवाल्यानं बिल गेट्स यांनादेखील आपल्या अनोख्या अंदाजात चहा पाजला आहे. तर, वडापाव गर्ल तिच्या स्टाईलमुळे बिग बॉस ओटीटीमध्ये पोहोचली होती. दोघांनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. देशात कदाचितच कुणी असेल, ज्यांना या दोघांबद्दल काहीच माहीत नसेल. पण, आता या दोघांना जर जपून राहावं लागणार आहे. कारण या दोघांना टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये 'मॉडल चायवाली' (Model Chaiwali) आली आहे. सध्या लखनऊमध्ये चहा विकणाऱ्या या स्टायलिश मॉडेल चायवालीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला पाहून आता डॉली चायवाल्याला जोरदार टक्कर मिळणार असल्याचं बोलंलं जात आहे. 

स्टायलिश स्टाईल ऑफ मॉडल चायवाली (Simran Gupta The Model Chai Wali)

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि लोकप्रियता मिळविण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. दिवसेंदिवस सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात लोक काहीना काही करामती करताना दिसतात. यातील काही व्हिडीओ नेटकऱ्यांकडून व्हायरल होतात.  तर, काही व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून टिकेची झोड उठवली जाते. सध्या सोशल मीडियावर मॉडल चायवाली व्हायरल होत आहे. तिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, मॉडल चायवाली स्कूटरवर तिच्या जागी पोहोचते. सर्वात आधी ती गुलाबाची चव असलेला चहा बनवण्यास सुरुवात करते. तर, दुसरीकडे मॅगी तडका देखील तयार करते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चहा तयार झाल्यानंतर तो ती गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवते आणि लोकांना देते. तिच्या आगळ्या वेगळ्या अंदाजामुळे ती प्रचंड व्हायरल झाली आहे.  

पाहा मॉडल चायवालीचा व्हिडीओ 

View this post on Instagram
 
A post shared by The Hungry Panjabi🤤😋 (@thehungrypanjabi_)

का व्हायरल होतेय 'मॉडेल चायवाली'?

'मॉडेल चायवाली'ची ओळख केवळ तिच्या चहाच्या स्टॉलसाठीच नाही तर तिचा फॅशनेबल लूक आणि आनंदी स्वभावामुळेही आहे. व्हिडीओमध्ये ती आपल्या टपरीवर चहा बनवताना मॉडलप्रमाणे पोझ देते आणि ग्राहकांशी संवाद साधते. तिचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा तिला इतर चहावाल्यांपेक्षा वेगळी बनवते. हा नवा ट्रेंड लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. 'मॉडेल चायवाली'च्या चहाच्या स्टॉलवर स्थानिकच नव्हे तर तरुणही येत आहेत. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, ते तिच्या चहाच्या चवीसोबतच तिच्या स्टाईलचे कौतूक करताना थकत नाहीत. काही युजर्सनी लिहिलं आहे की, "ही चायवाली खरोखरच अप्रतिम आहे." तर आणखी कुणीतरी म्हटलं आहे की, "तिची शैली खूप छान आहे."

व्हिडीओ पाहून नेटकरी खूश (Stylish Tea Seller)

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ thehungrypanjabi नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाख 42 हजारांहून अधिक लोकांना लाईक केला आहे. व्हिडीओ शेअर करत एक कॅची कॅप्शनही लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये मॉडल चायवालीच्या स्टॉलचा संपूर्ण पत्ता लिहिला आहे. 5 दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहणाऱ्या एका यूजरनं लिहिलं आहे की, चहामध्ये सर्व केसांचा कोंडा मिसळा. आणखी एका युजरनं लिहिलं आहे की, चहा ठीक आहे, पण मॉडेल कुठे आहे? 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पाकिस्तानात राहते Sridevi यांची 'तिसरी मुलगी'; आता सुपरस्टारसोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी भारतात दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाना गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाना गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIPSaif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाना गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाना गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Shiv Sena UBT : स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव ? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
Embed widget