Bhanudas Murkute: तब्बल 7 तास सुनावणी अन्... नगरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण?
Bhanudas Murkute: आमदार मुरकुटे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तब्बल सात तास चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या (Shrirampur) माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना महिला अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राहुरी पोलिसांनी (Rahul Police) सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले होते. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला आहे. आमदार मुरकुटे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तब्बल सात तास चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी माजी आमदार मुरकुटे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. 2019 पासून मुंबई, दिल्ली तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर आयपीसी कलम 376,328,418,506 अन्वये राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलीस मुरकुटे यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. ते रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले. रात्री साडेअकराच्या दरम्यान राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. तर या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली.
कोण आहेत माजी आमदार भानुदास मुरकुटे?
माजी आमदार भानुदास मुरकुटे हे अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय राहिलेले आहेत. ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर अलीकडच्या काळात भारत राष्ट्र समिती पक्षात दाखल झाले होते. आक्रमकपणासाठी ते ओळखले जातात. त्यांनी श्रीरामपूरच्या पाणीप्रश्नावरून, अशोक कारखान्याच्या ऊस पळवापळवीच्या कारणावरून महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या दोघांवरही हल्लाबोल केला होता.