एक्स्प्लोर

Sanjay Raut: जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवं; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं

Haryana Assembly Election Results 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्रातील जागावाटपात काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसला डिवचलं

मुंबई: अनुकूल परिस्थिती असतानाही हरियाणात काँग्रेस पक्षाला पराभवाचा धक्का बसला होता.  यानंतर काँग्रेस पक्ष राजकारणात पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी आला आहे. यामध्ये आता विरोधकांसोबत काँग्रेसचे (Congress) मित्रपक्षही वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत. लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला होता. त्यामुळे जागावाटपात काँग्रेसचे नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत होते. विशेषत: ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाच्या मुद्द्यावरुन रस्सीखेच सुरु आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणातील (Haryana Election Results 2024) पराभवानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवे, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून केली आहे.

हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजप-काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. हरयाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वास व स्थानिक नेत्यांच्या अरेरावीमुळे होताना दिसत आहे. हरयाणात पुन्हा भाजपचे सरकार येईल असे कुणीच ठामपणे म्हणत नव्हते. काँग्रेसचा विजय एकतर्फी होईल असे एकंदरीत वातावरण होते; पण जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकावे लागेल. हरयाणात भाजपविरोधी वातावरण होते. भाजपच्या मंत्र्यांना व उमेदवारांना हरयाणातील गावात घुसू देत नाहीत असा माहोल होता. तरीही हरयाणाचे निकाल काँग्रेसच्या विरोधात गेले, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे. 

काँग्रेसचे पक्षांतर्गत मतभेद भाजपच्या पथ्यावर पडले: सामना

हरयाणात स्थिती अनुकूल असतानाही काँग्रेसला फायदा घेता आला नाही. काँग्रेसच्या बाबतीत हे नेहमीच घडते. काँग्रेस पक्षाची अंतर्गत सुंदोपसुंदी भाजपच्या पथ्यावर पडली. हरयाणात मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी काँग्रेस पक्षाची नौका डुबवली काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसचे सूत्रधार आपणच व आपण ठरवू तेच उमेदवार अशी हुड्डा यांची भूमिका होती. पक्षातील कुमारी सेलजा यांच्यासारख्या नेत्यांचा जाहीर अपमान हुड्डा तसेच त्यांच्या लोकांनी केला व काँग्रेसचे दिल्लीतील हायकमांड हुड्डा यांना रोखण्यात अपयशी ठरले. हरयाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मोठे आंदोलन केले. हरयाणातील महिला कुस्तीपटूंच्या विनयभंगावर भाजपने व त्यांच्या पंतप्रधानांनी कोणतीच कारवाई केली नाही. विनेश फोगाट व तिच्या सहकाऱ्यांना दिल्लीतील जंतरमंतर रोडवरून फरफटत पोलीस व्हॅनमध्ये कोंबले… या सगळ्याची चीड हरयाणातील जनतेत स्पष्ट दिसत होती. अर्थात विनेश फोगाट स्वतः जिंकली तरी तिच्यावरील अन्यायामुळे हरयाणात सर्वदूर निर्माण झालेल्या संतापाचा, नाराजीचा फायदा काँग्रेसला झाला नाही. 

हरयाणात भाजपविरोधी लाट होती व त्या लाटेत भाजप वाहून जाईल असे सांगितले जात होते, पण तसे घडले नाही. कारण काँग्रेसचे संघटन विस्कळीत व हतबल होते. राजकारणात व निवडणुकीत संघटन जमिनीवर असावे लागते. भाजपचे संघटन मजबूत होते व 'स्ट्रटेजी' बिनचूक ठरली. मध्य प्रदेशात कमलनाथांनी भाजपला सरळ मदत केली. हरयाणात हुड्डा यांच्या मागेही केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा होता, तरीही हुड्डा हे काँग्रेसबरोबरच राहिले. हरयाणातील जाट समुदायाचे ते मोठे नेते, पण इतर समाजाला ते काँग्रेसबरोबर उभे करू शकले नाहीत. जाट विरुद्ध इतर समाज असा हा सामना झाला व त्यात भाजपने बाजी मारली. पुन्हा हरयाणातील भाजप विजयात बलात्काराच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आणि काही दिवसांपूर्वी 'पॅरोल'वर सुटून बाहेर आलेल्या बाबा राम रहीम याचाही 'वाटा' आहेच. हा बाबा नेमका निवडणुकीच्या काही दिवस आधी 'पॅरोल'वर कसा सुटतो? याआधीच्या निवडणुकांतही बाबा राम रहीमचे हे'निवडणूक कनेक्शन' दिसून आले हेते. 

निकालाच्या एक दिवसापूर्वीच हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सांगितले होते की, "भाजपच जिंकेल. आम्हीच जिंकू याचा सर्व बंदोबस्त केला आहे.'' सैनी यांचे हे विधान रहस्यमय आहे. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर होती. काँग्रेसने ठिकठिकाणी जिलेब्या-लाडू वाटायला सुरुवात केली; पण पुढच्या तासाभरात भाजपने आघाडी घेतली व काँग्रेस पिछाडीवर गेली. निवडणूक आयोगानेही नंतर मतमोजणीची गती मंद केली. हे का घडले? काँग्रेसची सर्वत्र आघाडी दिसत असताना मतमोजणी आणि त्याविषयीचे 'अपडेटस्' यांची गती अचानक कमी का झाली? काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी त्यावरून निवडणूक आयोगावर आरोपही केले आहेत. हरयाणातील भाजपचा विजय म्हणूनच संशयास्पद ठरला आहे. 

तेव्हा मोदी व शहा यांनी हरयाणाच्या विजयाने हुरळून जाऊ नये. कारण महत्त्वाचे राज्य असलेल्या जम्मू-कश्मीरात त्यांचा पराभव झाला आहे. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे नेते नाहीत हाच त्याचा अर्थ. हरयाणा आणि जम्मू-कश्मीरचे निकाल दिशादर्शक आहेत. उद्या महाराष्ट्रात निवडणुका होतील. महाराष्ट्रातील जनता हरयाणाच्या मार्गाने जाणार नाही व महाविकास आघाडी महाराष्ट्रात विजयी होईल. मोदी-शहा, फडणवीस-मिंधे यांच्या विरोधात मराठी जनमत आहे. महाराष्ट्राची बाजी महाविकास आघाडीच जिंकणार, पण राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हरयाणातील निकालापासून शिकावे असे बरेच काही आहे. हरयाणात काँग्रेसने 'आप'सह अनेक घटकांना दूर ठेवले. कारण सत्तेत त्यांना वाटेकरी नको होते. या खेळात संपूर्ण राज्यच हातचे गेले. जम्मू-कश्मीरमध्ये 'इंडिया' आघाडीचा विजय झाला. हरयाणात फक्त काँग्रेसची पीछेहाट झाली. हे चित्र 'इंडिया आघाडी'साठी बरे नाही, पण लक्षात कोण घेणार?, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे. 

आणखी वाचा

हरियाणाच्या निकालानंतर भाजपची स्टाईल बदलली, नवीन स्ट्रॅटेजी आखली, शिंदे गटाला महत्त्वाचा मेसेज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Australia vs India, 5th Test : इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
Donald Trump : लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन् 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?
लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन् 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Sarpanch santosh Deshmukh Case : बीड सरपंच प्रकरणात 3 जणांना अटक; A to Z Updates माझावरBeed Santosh Deshmukh Case : बीड प्रकरणी आरोपींवर सक्त कारवाई झाली पाहिजे : Anjali DamaniaSuresh Dhas On Beed Santosh Deshmukh Case : Sudarshan Ghule हा केवळ प्यादं! मुख्य आरोपी 'आका' आहे : Suresh DhasBeed Santosh Deshmukh Case : बीड हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Australia vs India, 5th Test : इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील 'या' शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्रीही अवाक!
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
'तर भर चौकात फाशी घेईन, अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..' वाल्मिक कराडने वापरलेल्या गाडीमालकाची स्पष्टोक्ती
Donald Trump : लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन् 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?
लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन् 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?
Mumbai Crime : शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
Ajmer Dargah : अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
Guardian Ministers List : उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
Human Metapneumovirus Virus : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
Embed widget