एक्स्प्लोर

Buldhana Accident: देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू

Accident death Buldhana: बुलढाण्यातील मेहकर-चिखली मार्गावर एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर-चिखली मार्गावर मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  मेहकर - चिखली रस्त्यावरील वरदडा या गावाजवळ हा अपघात (Buldhana Accident) झाला. एक दुचाकी एसटी बसवर (ST Bus) जोरात आदळून हा अपघात झाला. यावेळी दुचाकी प्रचंड वेगात असल्याने त्यावरुन प्रवास करणाऱ्या तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 

प्राथमिक माहितीनुसार, हे तिन्ही तरुण मेहकर परिसरातील देवीचे दर्शन घेऊन आपल्या घरी परतत होते. गोपाल सुरडकर , सुनील सोनोने आणि धनंजय ठेंग, अशी या मृत तरुणांची नावे आहेत. हे तिघेही एकाच बाईकवरुन (Bike in Speed) प्रवास करत होते. अपघाताच्यावेळी त्यांच्या बाईकचा वेग खूपच जास्त होता. मेहकर-चिखली महामार्गावरुन (Mehkar Chikhli Road) वेगात दुचाकी पिटाळत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ते वरदडा फाट्याजवळ आदिवासी पारधी शाळेजवळ (School) रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या एका एसटी बसवर पाठीमागच्या बाजूला जाऊन आदळले.

ही एसटी बस बिघडली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही बस वरदडा  गावाजळ रस्त्यालगत उभी करुन ठेवण्यात आली. तरुणांची प्रचंड वेगात असलेली दुचाकी नेमकी याच एसटीवर येऊन जोरात आदळली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, गोपाल, सुनील आणि धनंजय यांनी जागेवरच प्राण सोडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची संधीही मिळाली नाही. या तिघांपैकी एकाच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मेहकर-चिखली मार्गावर रक्ताचा सडा पडला होता. या दुर्दैवी घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात

दोन दिवसांपूर्वी नाशिक-मुंबई महामार्गावर (Mumbai Nashik Highway) नवीन कसारा घाटात एक भीषण अपघात झाला होता. एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तो अनियंत्रित झाला. या भरधाव कंटेनरने 4 कार उडवल्या होत्या. यापैकी एका कारच्या बोनेटचा भाग धडकेत चेपला गेला. त्यामुळे या कारमधील लहान मुलगा आणि कंटेनर चालकाला गाडीचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले होते. यासाठी तब्बल तासभर लागला होता. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले होते. 

आणखी वाचा

समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?

ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील फटीत अडकला, फरफटत गेला, रोहा स्थानकात अंगावर काटा आणणारा अपघात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान; आजवर कुणाकुणाला मिळाले पद?
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणारे दुसरे; तर पहिले कोण?
Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले
नाना वाचले, बाबा गेले, एकनाथ शिंदेंनी मविआला धू धू धुतलं, फडणवीसही हसू लागले!
Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : नाना धन्यवाद, नार्वेकर पुन्हा आले,पहिल्याच भाषणात चौकार-षटकारKolhapur Kognoli Toll Naka : ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोगनोळी टोल नाक्यावर रोखलंRahul Narvekar Vidhansabha speaker: विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवडABP Majha Headlines :  12 PM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान; आजवर कुणाकुणाला मिळाले पद?
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणारे दुसरे; तर पहिले कोण?
Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले
नाना वाचले, बाबा गेले, एकनाथ शिंदेंनी मविआला धू धू धुतलं, फडणवीसही हसू लागले!
Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही
Maharashtra Cabinet: महायुती सरकाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, वर्षा बंगल्यावरील बैठकीत शिंदे-फडणवीसांमध्ये नेमकं काय ठरलं?
महायुती सरकाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, वर्षा बंगल्यावरील बैठकीत शिंदे-फडणवीसांमध्ये नेमकं काय ठरलं?
Solapur Accident: पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Embed widget