एक्स्प्लोर
महाराष्ट्र बंद LIVE : चांदणी चौकात दगडफेक, पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर
महाराष्ट्र बंद: या बंदमध्ये मुंबईचा समावेश असला तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी होणार नाही.
महाराष्ट्र बंद मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. या बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी झालेला नाही. मराठा समाज समन्वयक आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगून नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा संघटनांनी बंदमधून माघार घेतली आहे. या ठिकाणी बंदऐवजी ठिय्या करुन निषेध नोंदवला जाणार आहे.
आजच्या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळं दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरु ठेवण्यात आल्या. पण खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील काही शाळांनी सुट्टी जाहीर केली.
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा 23 जुलैला गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर 25 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर आज 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिनाचं औचित्य साधत, मराठा मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
LIVE UPDATE
4.46: PM - हिंसा टाळा, संयम आणि शांततेने, लोकशाही मार्गाने आंदोलन करा: विश्वास नांगरे पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक 4.25 PM - औरंगाबदमध्येही मराठा आंदोलना हिंसक वळण, आंदोलकांनी 2 खासगी वाहनं पेटवली, नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या, जमावाच्या दगडफेकीनंतर वाळूंज परिसरात पोलिसांचा हवेत गोळीबार 3.55 PM पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राड्यानंतर तिकडे चांदणी चौकातही मोठा राडा झाला. चांदणी चौकात जमाव हिंसक झाला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार सुरु केला. त्यानंतर जमावाने आणखी आक्रमक पवित्रा घेत, थेट पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलिस जखमी झाले. या प्रकाराने चांदणी चौकात परिस्थिती चांगलीच चिघळली. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. तसंच लाठीमारही केला. मात्र जमावाच्या दगडफेकी अनेक पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. 3.45 PM पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, चांदणी चौकातील सर्व रस्ते आणि पुणे - मुंबई एक्सप्रेस वे रोखले. एक्सप्रेस वे वरील उर्से टोलनाक्यावर आंदोलक आक्रमक 3.21 PM पुण्यात चांदणी चौकात आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार. आंदोलकांकडून दगडफेक. पोलिस जखमी. चांदणी चौकात परिस्थिती चिघळली. पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर. लाठीमार. काही पोलिस जखमी. 2.45 PM नाशिकमध्ये मराठा आंदोलकांच्या दोन गटात हाणामारी- नाशिकमध्ये ठिय्या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांच्या दोन गटांमध्ये धक्काबुक्की, माजी आमदार माणिकराव कोकाटे स्टेजवर गेल्याने वाद 2.00 PM - सकल मराठा क्रांती मोर्चा संपल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड, जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारावं अशी आंदोलकाची मागणी होती, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन न स्वीकारल्याने तोडफोड केल्याचा आरोप. पण जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा आरोप फेटाळला. सविस्तर बातमी - 18-20 वयाच्या मुलांनी तोडफोड केली: पुणे जिल्हाधिकारी आंदोलकांकडून मीडियाच्या काही प्रतिनिधींना धक्काबुक्की 1.25 PM अडीच तासनंतर मालेगावच्या टेहरे चौफुली येथील आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र महामार्गवरील वाहतुक सुरु झालेली नाही 1.14 PM लोणावळा रेल्वे स्थानकावर आंदोलनकर्ते पोहचले. भुसावळ एक्सप्रेस रोखली. निदर्शने करून रेल्वे मार्ग खुला केला. 12.22 PM - सोलापूर संभाजी चौकातील चक्का जाम आंदोलनात मुस्लिम बांधव सहभागी. मराठा आरक्षणाला समर्थन. मुस्लिम बांधवांची घोषणाबाजी. 12.05 PM - सकल मराठा समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधान भवनावर धडक मोर्चा काढला. आज विधानभवनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर प्रकाश आबिटकर आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे परवानगी मागितली आहे. मात्र सुरक्षा राक्षकांकडून त्यांना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आडवण्यात आलंय. कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांना विधानभवनाच्या प्रांगणात जाण्यापासून सुरक्षारक्षकांनी रोखलं, आमदार आबिटकरयांचं विधानभवन प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरु 12.02 PM - कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत बंद 11.55 AM पुण्यातील लक्ष्मी रोड पीएमटी बसवर दगडफेक करुन काचा फोडल्या. 11.52 AM वसई : वसई, विरार, नालासोपाऱ्यात कडकडीत बंद. वसई तालुक्यात मोटारसायकल रॅली काढून, पूर्ण शहर बंद करण्यात आले 11. 15 AM – बीड: जिल्ह्यात उत्स्फूर्त बंद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या, रस्त्यावर बसून आंदोलकांचा जेवण 10.59 AM माढा -सोलापुरातील माढ्यातही आचारसंहिता भंग, माढा-शेटफळ रस्त्यावर उपळाईत टायर जाळले, बाभळी टाकळी रस्ता सकाळपासून रोखला 10.55 AM - पुणे चाकण चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, ड्रोनद्वारे पोलिसांची आंदोलकांवर नजर जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा टाळ इथं मृदंगाचा गजर. भजन कीर्तनातून शासनाचा निषेध. 10.50 AM - वाशिम- जिल्ह्यातील मालेगाव इथं नागपूर - मुंबई रोडवर मालेगाव बायपास इथं रास्तारोको, मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली 10.40 AM - धुळ्यात बसस्थानक, शाळा, महाविद्यालयात शुकशुकाट, मात्र बाजारपेठा सुरळीत 10.35 AM - बुलडाणा - शेगाव शहरात कडकडीत बंद, मेहकर येथील नागपूर- मुंबई महामार्गावर आंदोलकांचा ठिय्या, काकासाहेब शिंदे अमर रहे, बुलडाण्यात घोषणाबाजी 10. 30 AM औरंगाबादमध्ये कडकडीत बंद, बंदच्या पर्शवभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त, 2500 पोलीस कर्मचारी, 4 एसआरपी तुकडी,1 रॅपिड अॅक्शन फोर्स तुकडी,1 डीसीपी, 6 एसीपी, 25 पोलीस निरीक्षक, 120 पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक, 300 होमगार्ड शहरात तैनात10.24 AM जालना-भोकरदन रोडवर टायर जाळून आंदोलकांचा ठिय्या, जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम 10.15 AM लातूर जिल्ह्यात कडकडीत बंद, सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी,एसटी बस जागीच उभ्या, बाजारपेठ बंद, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, लातूरमधून बाहेरगावी जाणारी-येणारी रस्ते वाहतूक बंद 10.10 AM अहमदनगर: राहाता तालुक्यातील साकुरी शिवारात नगर-मनमाड महामार्गावर टायर जाळले, वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न 10.02 AM– बुलडाणा जिल्ह्यात कडकडीत बंद, एसटी सेवा ठप्प, अनेक ठिकाणी रस्ता रोको,शाळा -कॉलेज पूर्ण बंद 10.00 AM सोलापूर - सकल मराठा समाजाच्या आवाहनानुसार सोलापुरात आज सकाळपासून संमिश्र बंद पाळण्यात येतोय. जिल्ह्यातील 133 मार्गावर आज मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलन होणार आहेत. ग्रामीण भागातील जाळपोळीचे काही अपवाद वगळता शहरातील व्यवहार सुरळीत सुरु आहेत. आंदोलनातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. महत्त्वाच्या मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 9.54 AM बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांचा ठिय्या#महाराष्ट्रबंद LIVE – औरंगाबादमध्ये कडकडीत बंद, बंदच्या पर्शवभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त, 2500 पोलीस कर्मचारी, 4 एसआरपी तुकडी,1 रॅपिड अॅक्शन फोर्स तुकडी,1 डीसीपी, 6 एसीपी, 25 पोलीस निरीक्षक, 120 पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक, 300 होमगार्ड शहरात तैनात @KrishnaABP pic.twitter.com/5Z6fCPu029
— ABP माझा (@abpmajhatv) August 9, 2018
9.53 AM : पिंपरी चिंचवड हिंजवडीतील आयटी कंपन्यावर बंदचा परिणाम, बहुतांश कंपन्या बंद, हिंजवडीत एकूण 120 छोट्या-मोठ्या कंपन्या, साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. या सर्वांवर आजच्या बंदचा परिणाम 9.50 AM यवतमाळमध्ये मराठा मोर्चा आंदोलकांची बाईक रॅली. यवतमाळ बसस्थानकात एसटी वाहतूक पूर्णपणे थांबली. लांब पल्ल्याच्या आणि सर्व ग्रामीण भागातील वाहतुकीवर परिणाम. यवतमाळमधील व्यापारही पूर्णपणे बंद https://twitter.com/abpmajhatv/status/1027412685632073728 9.45 AM पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बंदचा परिणाम. लोणावळा शहरात ही व्यवहार ठप्प. जुना पुणे- मुंबई महामार्ग ही रिकामा 9.40 AM इंटरनेट बंद - कोल्हापूर, सोलापूर, सांगली (शहर), औरंगाबाद, पंढरपूर (4 वाजेपर्यंत), पुण्यात – शिरुर, खेड, बारामती, मावळ, दौंड, भोर या परिसरात इंटरनेट बंद 9.15 AM कोल्हापूर- बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद. दूध संकलन, साखर कारखाने. शिक्षण संस्था बंद 9.00 AM - रायगड आजच्या महाराष्ट्र बंदला रायगड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाड, अलिबाग, खोपोली, खालापूर येथे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर खोपोली आणि अलिबाग येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 8.45 AM : भोसरी MIDC बंद. MIDC परिसरात साडे तीन हजार, तसेच कुदळवाडी, तळवडे आणि शहरात अशा एकूण आठ हजार कंपन्यांवर परिणाम. या सर्व कंपन्यांमधील साडे तीन लाख कर्मचाऱ्यांना आज सुट्टी. 8.30 AM नाशिक :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय, यात नाशिकचा सहभाग नसला तरी देखील संभ्रम कायम असल्यानं देवस्थानच्या ठिकणी होणाऱ्या गर्दीवर परिणाम झाला. 12 ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी एरव्ही हजारो भाविक हजेरी लावतात. मात्र आज तुरळक गर्दी आहे. नाशिक शहरात काल रात्री अज्ञाताकडून 4/5 बसेसची तोडफोड झाल्यानं जिल्ह्यातील बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळं गर्दी रोडावली असून बसस्थानक ओस पडलेत. 8.15 AM मालेगाव-मराठा आरक्षणासाठी सहा वेगवेळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार. 8.10AM सोलापूर - मराठा आंदोलनाला हिंसक वळण, ग्रामीण भागात पहाटेपासून आंदोलनास सुरुवात. माढा- शेटफळ मार्गावर आंदोलक आक्रमक. बाभळीची झाडे आणि टायर पेटवून चक्का जाम. पहाटेपासून तरुणांनी मोटारसायकल रॅली काढून आंदोलनास सुरुवात केली. 8.00AM सिंधुदुर्ग: सकल मराठा समाजाच्यावतीने आज जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा बंद नाही. जेलभरो आंदोलन पूर्णपणे शांततेत केले जाणार आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यात जेलभरो आंदोलन केले जाणार असून, आंदोलक स्वतः पोलिस स्टेशनला मोर्चा घेऊन जात जेलभरो करणार आहेत. 11 वाजता जेलभरो आंदोलनाला सुरुवात होईल. नाशिक जिल्ह्यात आज सटाणा,देवळा,कळवण,उमराणे येथे बंद पुकारण्यात आला आहे. हिंगोली जिल्हा संपूर्ण बंद. शाळा महाविद्यालय तसेच संपूर्ण जिल्ह्यातील बस सेवा बंद नागपूर- आजच्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सर्वच खासगी शाळांना सुट्टी जाहीर#महाराष्ट्रबंद LIVE – बारामती शरद पवारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या https://t.co/M9L71JhgLc @PawarSpeaks pic.twitter.com/mTOv7o3tsC
— ABP माझा (@abpmajhatv) August 9, 2018
मुंबई: मराठा संघटनांचं वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - सकाळी 11 वाजता
नवी मुंबई : मराठा आंदोलनाच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेने शाळांना सुट्टी दिली आहे. नवी मुंबईत कोणत्याही प्रकारचे बंद किंवा आंदोलन करणार नसल्याचं मराठा समन्वयकांनी स्पष्ट केलं आहे. मात्र यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून मनपाने आपल्या शाळांना सुट्टी दिली आहे. खाजगी शाळांनीही उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद मुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भात आदेश दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व शैक्षणिक संस्था व महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत, असे विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. औरंगाबाद, बीड, नांदेड, जालना: जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयं बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. औरंगाबादेत मराठा समन्वयक समितीची बैठक घेण्यात आली. कसे आंदोलन करावं, याचा निर्णय प्रत्येक जिल्ह्याने घ्यावा, असा निर्णय झाला. औरंगाबादमध्ये 10 ऑगस्टनंतर साखळी आंदोलन, तर 15 तारखेनंतर एक वेळ चूल बंद आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तातडीनं मागे घ्या, यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे. नवी मुंबईत एपीएमसी मार्केट आज बंद राहणार आहे. राज्यातील विविध भागातून एपीएमसीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची आवक होते. येणाऱ्या गाड्यांवर कोणत्याही प्रकारची दगडफेक होऊ नये, हायवे जाम केल्यास भाजीपाला अडकून नुकसान होऊ नये, त्याचबरोबर मुंबई आणि उपनगरामध्ये बंद झाल्यास एपीएमसीमध्ये आलेला माल विकला जाणार नाही. यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा विचार करुन आज एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चाकण बंद: चाकणमध्ये रास्ता रोको होणार नसून शहर बंद ठेवण्यात येणार आहे. मावळ बंद मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील उर्से टोल नाका : सकाळी 11 वाजता (15 मिनिटं रोखणार) लोणावळा रेल्वे स्टेशन : दुपारी 1 वाजता (भुसावळ एक्स्प्रेस 10 मिनिटं रोखणार) जुना पुणे-मुंबई महामार्ग : तळेगाव आणि कान्हे फाटा येथे दिवसभरात कधीही रोखला जाईल पिंपरी चिंचवड बंद पिंपरी चिंचवड शहर बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. हिंजवडीतील आयटी कंपन्या बंद ठेवण्याचा कंपन्यांचा निर्णय आहे. काही कंपन्यांनी वर्क फॉर होमचा पर्याय अवलंबला आहे. तर ज्यांचं अतिशय महत्त्वाचं काम आहे, ते कर्मचारी सकाळी नऊ वाजण्याच्या आधी कंपनीत पोहचणार आणि सायंकाळी सहानंतर कंपनीतून बाहेर पडणार. हिंजवडीत एकूण 120 छोट्या-मोठ्या कंपन्या असून इथे साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. या सर्वांवर बंदचा परिणाम होणार आहे.पुण्यात पीएमपी बसचे कोणते मार्ग बंद?
सोलापूरमध्ये सकल मराठा समाज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचा पुणे नाक्यावर चक्का जाम आहे. दोन्ही ठिकाणी हजारो आंदोलक उपस्थित राहणार आहेत. सोलापूर कोणत्याही प्रकारे बंद नसेल. सर्व व्यवहार चालू राहतील. आंदोलन शांततेत करण्याचं मराठा समाजाचं आवाहन आहे. विश्व आदिवासी दिवस असल्याने नंदुरबार बंदला स्थगिती देण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय. 'महाराष्ट्र बंद'साठी सकल मराठा समाजाची आचारसंहिता बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे कोणत्याही शासकीय वा खाजगी मालमतेची तोडफोड अथवा मोडतोड करु नये मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करायचे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आपली जबाबदारी आहे पोलिस प्रशासनला सहकार्य करा बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत अफवांवर विश्वास ठेवू नका मराठा सेवकांनी शांत राहून अॅक्शन प्लॅन तयार करायचा आहे बंद असा करायचा की पुढच्या वर्षी फक्त क्रांती दिन नाही तर "मराठा क्रांती दिन" असं नमूद केलं पाहिजे संबंधित बातम्या बंदसाठी सकल मराठा समाजाची आचारसंहिता आरक्षण परिषद : मराठा आरक्षणावर तरुणांच्या भावना, प्रश्न आणि तज्ज्ञांची उत्तरं स्पेशल रिपोर्ट : आधी आरक्षण, नंतर भरती, मराठा समाजाची मागणीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement