जे घराच्या बाहेर पडले नाहीत ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची भाषा करतायेत, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
जे घराच्या बाहेर पडले नाहीत ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची भाषा आमच्याबरोबर करत आहेत, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
CM Eknath Shinde : जे घराच्या बाहेर पडले नाहीत ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची भाषा आमच्याबरोबर करत आहेत, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता लगावला. त्यांनीचं शेतकऱ्यांच्या (Farmers) तोंडाला पाने पुसण्याचं काम केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आमचे सगळे मंत्री आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तिजोरीवर कितीही ताण पडला तरी आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही खोटे गुन्हे कधीही दाखल करत नाही.
गुन्हाच्या बाबतीत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही खोटे गुन्हे कधीही दाखल करत नाही. हे पाप आम्ही कधी केलं नाही. आम्ही जे सत्य आहे तेच करतो असे ते म्हणाले. अडीच वर्षाच्या काळात कोणाकोणावर खोटे गुन्हे दाखल झाले हे आपल्याला माहित असेल असे शिंदे म्हणाले. यामध्ये नारायण राणे असतील नवनीत राणा असतील किंवा गिरीश महाजन असतील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम कोणी केले हे सर्वांना माहित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गुन्हे लपवून कातडी वाचवणार आमचं सरकार नसल्याचे फडणवीस म्हणाले.
कुठे फेडाल हे पाप
भ्रष्टाचाराच्या बाबतीत आमच्यावर आरोप केले जात आहेत. पण खरा भ्रष्टाचार कोणी केला, कुठं केला हे आपल्याला माहित असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. खिचडीमध्ये, बॉडी बॅगमध्ये, ऑक्सिजन प्लांटमध्ये तुम्ही भ्रष्टाचार केला. कोवीडमध्ये एकीकडे माणसं मरत असताना तुम्ही पैसे मिळवत होतो, कुठे फेडाल हे पाप असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली. सत्य जनतेसमोर आणण्याचे काम गृहविभाग करेल असे एकनाश शिंदे म्हणाले.
आम्ही दिल्लीला जातो, निधी आणतो
ज्यांना मॅडमच्या परवानगिशीवाय नाक खांजवायची पण सवय नाही त्यांनी आमच्यावर बोलालं, स्वाभिमानाची भाषा करावी, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता विरोधकांवर टीका केली. आम्ही दिल्लीला जातो, निधी आणतो. मागितल्याशिवाय मिळत नाही. प्रयत्न करावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो असे शिंदे म्हणाले. मागच्या अडीच वर्षात तुमच्या अहंकारामुळं केंद्र सरकारनं पैसे दिले नाहीत. अनेक प्रकल्प बंद पडल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पण आमचं सरकार आल्यानंतर सगळी वितासकामं प्रकल्प सुरु झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठा समाजाला टीकणारं आरक्षण देणार
आमचं सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेईल. कोणावरही अन्याय करणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मी तर दसरा मेळाव्यात शपथ घेऊन सांगितलं आहे की, मराठा आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ओबीसी नेत्यांबरोबर आम्ही बैठक घेतली. तुम्ही चिंता करु नका, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागत मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कायद्यानं टिकाणार आरक्षण आम्ही देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मिळालें आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेलं. याला कोण कारणीभूत आहे हे मी योग्य वेळी सांगेन असं मुख्यमंत्री म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)