(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bacchu Kadu : सर्वप्रथम आमची शेतकऱ्यांची आघाडी, आमचा मुद्दा जो मान्य करेल त्याला आमचा पाठिंबा; बच्चू कडूंचा पुनरुच्चार
Bacchu Kadu : सध्याघडीला आम्ही अजून युतीमध्ये आहोत. मात्र येत्या 9 तारखेला आम्ही आमची ताकद दाखवू अन् त्यानंतर अंतिम निर्णय घेऊ. अशी मोठी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पार पडल्यानंतर आता साऱ्यांना वेध लागले आहे ते आगामी विधानसभा निवडणुकांचे. (Vidhan Sabha Election 2024) त्या अनुषंगाने जवळ जवळ सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून प्रत्येक मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. अशातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मोठी घोषणा केली आहे.
बच्चू कडू यांनी स्वतःची आघाडी करण्याचा विचार केला असून सध्याघडीला आम्ही अजून युतीमध्ये आहोत. मात्र येत्या 9 तारखेला आम्ही आमची ताकद दाखवू अन् त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. अशी मोठी घोषणा आज प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली आहे. तर आम्हाला तिसरी आघाडी म्हणू नका, आम्ही पाहिली आघाडी आहोत आणि मुळात आमची शेतकऱ्यांची आघाडी असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.
आमचे 16 मुद्दे आहेत, जे ते मान्य करेल त्याला आमचा पाठिंबा- बच्चू कडू
राज्यातले सरकार सध्या ज्या योजना आणत आहे त्यांच योजना काँग्रेसने आणण्याचा प्रयत्न केलाय. जर महायुती सरकार तेच करणार असेल तर काय अर्थ आहे. आमचे 16 मुद्दे आहेत, ते जर मान्य होतं असतील तर ते जे कोणी मान्य करेल त्या आघाडी, युतीला आमचा पाठिंबा असेल, असेही बच्चू कडू म्हणाले. आम्ही मुद्यावर लढतोय आम्हला विधानसेभेची अपेक्षा नाही. मुद्दा मान्य झाला तर ज्यांनी तो मान्य केला त्यांना आम्ही पाठिंबा देणार असल्याचेही ते म्हणाले.
छ. संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू - बच्चू कडू
सध्याघडीला देशात मोठा प्रश्न आर्थिक विषमतेचा आहे. काम करणार्याला कमी पैसे आणि एजन्टला जास्त पैसे मिळतात. काम न करणार्यासाठी शासन आहे का, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. तर दुसरीकडे शासन लेक लाडकी योजना जाहीर करते आहे. कष्ट करणाऱ्याला पैसे दिले पाहिजेत. पैसे नसतील तर त्यांना सल्ला आहे. तर दुसरीकडे गर्व्हनरचा बंगला चाळीस एकर वर आहे. अशा परिस्थितीत तो विका त्याचे एक लाखभर कोटी येतील, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. ज्या पारशी लोकांनी अत्याचार केले. त्यांच्याकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी मुंबईत आहे. कष्ट करणार्याचे मूल्य जपले पाहिजे. दिव्यांग, कष्टकरी यांचा बजेटमध्ये किती वाटा आहे, हे आम्ही विचारतोय. श्रीमंत अधिक श्रीमंत होण्याचे मार्ग आम्ही तोडतोय. तर येत्या 9 ऑगस्टला संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू आणि त्यानंतर मग अंतिम निर्णय घेऊ, असेही बच्चू कडू म्हणाले.
हे ही वाचा