एक्स्प्लोर

D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज

मोदी यांनी महाराष्ट्रामधील पहिल्या सभेमध्ये बोलताना काँग्रेसची योजना फसव्या असल्याचे म्हणत जी योजना, आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत अशी टीका केली होती.

D K Shivakumar : भाजपकडून खोटा प्रचार सुरू आहे, कर्नाटकमध्ये सरकारकडून जे वादे करण्यात आले ते पूर्ण केले नाहीत, असा खोटा प्रचार भाजपकडून सुरू आहे. मात्र, महायुतीच्या सर्व नेत्यांना मी आमंत्रित करतो, त्यांच्या येण्या जाण्याचा सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टर्ड आम्ही देतो. त्यांनी येऊन आमच्या योजना बघाव्यात अशा शब्दात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार यांनी पीएम मोदी यांनी केलेल्या टीकेवर घणाघाती प्रहार केला. आज काँग्रेसशासित राज्यांमधील मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये एकत्र येत मोदींकडून झालेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मोदी यांनी महाराष्ट्रामधील पहिल्या सभेमध्ये बोलताना काँग्रेसची योजना फसव्या असल्याचे म्हणत जी योजना, आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत अशी टीका केली होती. या टिकेचा समाचार घेत आज काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि प्रत्युत्तर दिले. 

महायुतीला आम्ही कर्नाटकमध्ये येण्यासाठी आमंत्रित करत आहोत

शिवकुमार यावेळी बोलताना म्हणाले की भाजपने आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. महायुतीला आम्ही कर्नाटकमध्ये येण्यासाठी आमंत्रित करत आहोत. आम्ही घोषणा केलेल्या सर्व योजना सुरू आहेत ते त्यांनी एकदा येऊन पाहावे. ते म्हणाले की,  पंतप्रधानांच्या खोट्या गोष्टी समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र आले आहेत. ही देशातील ऐतिहासिक पत्रकार परिषद आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले की पंतप्रधान यांनी खोटे बोलणं सोडलं सोडलेलं नाही तर आम्ही खरं बोलणं सोडणार नाही. तेलंगाणामध्ये आम्ही योजना राबविल्या आहेत, याची वस्तुस्थिती तुमच्यासमोर ठेवणं माझी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. मोदी यांनी शेतकऱ्यांवर काळा कायदा लादल्याच ते म्हणाले. मोदी अदानी आणि अंबानींसाठी काम करत आहेत. तेलंगणात 17000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली. सोनिया गांधी यांनी तेलंगणा प्रदेश बनवण्याची गॅरंटी दिली होती. 

एकनाथ शिंदे आणि अजित पवार गुजरातचे गुलाम बनून काम करत आहेत

ते  म्हणाले की, दहा महिन्यांमध्ये आम्ही पन्नास हजार नोकऱ्या दिल्या. पाचशे रुपयांमध्ये सिलेंडर दिला. 200 युनिट मोफत देण्यात आली. महिलांसाठी मोफत प्रवास दिला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गुजरातचे गुलाम बनून काम करत आहेत, अशा शब्दात रेवंत रेड्डी यांनी दोघांवर तोफ डागली. दरम्यान हिमाचलचे मुख्यमंत्री हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी सुद्धा हल्लाबोल केला. ते म्हणाले की हिमाचलमध्ये 5000 रुपये मिळायचे, पण आमच्या जुन्या पेन्शनमुळे 50 हजार रुपये मिळू लागले आहेत. 27 वर्षांपासून 5000 अनाथ मुलांना आम्ही पालकत्व दिलं आहे. हे देशातील एकमेव राज्य आहेत ज्या ठिकाणी गाईचे दूध 45 आणि म्हशीच्या दुधाला 55 रुपये किंमत निर्धारित केली आहे. 18 वर्षावरील मुलींना आम्ही पंधराशे रुपये देत आहोत. विधवा महिलांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च सरकारने उचलला आहे. महाराष्ट्रात निवडणूक आहे आणि हिमाचल प्रदेशची चर्चा होत आहे. आम्ही सत्ता सुख घेण्यासाठी नाही आलो, मनमोहन सिंग यांच्यानंतर राहुल गांधी यांना संधी होती असेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही परिवर्तनासाठी आलो असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

सोलापुरात महायुतीची बैठक, शरद पवारांच्या गटाचे तीन आमदार उपस्थित, मोहित पाटील पडले एकाकी
सोलापुरात महायुतीची बैठक, शरद पवारांच्या गटाचे तीन आमदार उपस्थित, मोहित पाटील पडले एकाकी
Nashik Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी : नरेंद्र दराडेंच्या बाजूला बसून माघारीची घोषणा, पण दराडेंना पाठिंबा देणार का? प्रश्न विचारताच गोकुळ गीते ताडकन उठून निघाले!
नरेंद्र दराडेंच्या बाजूला बसून माघारीची घोषणा, पण दराडेंना पाठिंबा देणार का? प्रश्न विचारताच गोकुळ गीते ताडकन उठून निघाले!
Nashik Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार
अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार
Nashik Vidhan Parishad Election 2026: म्हाडा घोटाळ्यात 'सुप्रीम' कारवाईची भीती दाखवून गीते बंधूंचे बंड थंड? राज्य सरकारच्या 'त्या' पत्राने चर्चांना उधाण
म्हाडा घोटाळ्यात 'सुप्रीम' कारवाईची भीती दाखवून गीते बंधूंचे बंड थंड? राज्य सरकारच्या 'त्या' पत्राने चर्चांना उधाण

व्हिडीओ

Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद
Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
Prasad Vedpathak: सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड!
सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड!
Embed widget