ABP Majha Headlines : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
भाजप नेत्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी ठाकरे कुटुंबिय आणि मुंडे कुटुंबियांसोबत असलेल्या संबंधाबाबत भाष्य केलं आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर आज (दि.8) पूनम महाजन बोलताना पूनम महाजन यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेल्या रिलेशनबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. पूनम महाजन काय काय म्हणाल्या? मी गोपीनाथ मुंडेंना गोपीमामा म्हणायचे. गोपीमामा असल्यामुळे माझी तशी ऐट राहिली होती. 2014 ला निवडून आले, जेव्हा शपथ घेतली. समोर गोपीनाथ मुंडे असतील आपलं संसदेत ठीक राहिलं, असं वाटायचं. डोळे शोधत होते, ते पण नाही राहिले. दोघींचे वडिल नाहीयेत. त्यानुसार आमचा प्रवास खडतर असेल. पण मी भरपूर वाचन करते मला वाचायची आवड आहे. आपल्या आयुष्यात काही पान पुस्तकांसाठी बनत असतात. मला वाटतं तिच्या आणि माझ्या आयुष्यासाठी त्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आमची चर्चा राजकारणापेक्षा मुलं -बाळ, सासू -नणंद यावर चर्चा होती. निवडणुका लढतो, तेव्हा आम्ही एकमेकींसाठी प्रार्थना करत होतो. कधी आम्ही एकमेकांना ताई-माई म्हटलो नाही. राजकारण सोडून आम्ही आयुष्य सोबत घालवलं. सुख सर्वांबरोबर वाटतो. दु:ख आम्ही एकमेकिंबरोबर वाटतो, असं पूनम महाजन म्हणाल्या. मी प्रमोदजींच्या भाषणांचं संकलन करणार आहे पूनम महाजन म्हणाल्या, माझी सध्याची वेळ दुर्दैवाची नाहीये. मी सकारात्मक माणूस आहे. पुढील पाच वर्षे कदाचित माझ्या सुदैवाची असतील. प्रमोद महाजन यांच्या भाषणाचं संकलन माझ्याकडे आहे. पण ते एवढ्या चांगल्या क्वालिटीचं नाहीये. त्यासाठी मी माझी जुनी युवा मोर्चाची जी टीम आहे, त्यातील मुलांचे मी सांगते त्याकडे लक्ष असते. आता मी निवडणूक झाल्यानंतर एक टीम बनवणार आहे. प्रमोदजींचं काम संपूर्ण देशभरात आहे. खूप काळ लोटलाय, पण एवढाही काळ लोटलेला नाही. त्यामुळे प्रमोदजींच्या भाषणांचं संकलन मी करणार आहे. एक पुस्तक किंवा डॉक्युमेंट्री बनवण्याचा प्रयत्न करेन. फक्त त्यासाठी माझी संपत्ती कमी आहे, मला भरपूर लोकांकडे मदत घेण्यासाठी जावे लागेल.