Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Income Tax Raid : मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत हवालाच्या मदतीने पैशांचे व्यवहार झाल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती.
Income Tax Raid : राज्यात निवडणुकीचा धामधूम सुरु असतानाच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे स्वीय सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर आयकर छापा टाकण्यात आला आहे. आयकर विभागाकडून सुनील कुमार श्रीवास्तव आणि त्याच्या साथीदारांच्या 17 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रांचीमध्ये सात आणि जमशेदपूरमध्ये नऊ ठिकाणी इन्कम टॅक्सचे छापे पडत आहेत. जमशेदपूरच्या अंजनिया इस्पातसह इतर ठिकाणांचाही समावेश आहे. छापेमारीबाबत सविस्तर माहिती येणे बाकी आहे. आयकराची ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे.
निवडणुकीत हवालाद्वारे पैशांचा व्यवहार
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत हवालाच्या मदतीने पैशांचे व्यवहार झाल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. त्यावर 26 ऑक्टोबर रोजी आयटीने रांची, जमशेदपूर, गिरिडीह आणि कोलकाता येथील 35 ठिकाणी छापे टाकले होते. या काळात सुमारे 150 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता आणि गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. छाप्यात सापडलेल्या रकमेची व्यापाऱ्यांच्या खात्यांच्या वह्यांशी जुळणी करून 70 लाख रुपये जप्त करून बँकेत जमा करण्यात आले. हे सर्व झारखंडच्या निवडणुकीशीही जोडलं गेलं आहे. या छाप्याचाही याच्याशी संबंध जोडला जात आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
5 नोव्हेंबर रोजी पंकज मिश्रा यांच्या जवळच्या ठिकाणांवर छापे
काही दिवसांपूर्वीही आयकर विभागाने रांचीमध्ये दोन ठिकाणी कारवाई केली होती. यापूर्वी 5 नोव्हेंबर रोजी 1200 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर खाण घोटाळ्यात सीबीआयने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळच्या पंकज मिश्रा यांच्या जवळच्या 16 ठिकाणी छापे टाकले होते. या कालावधीत तपास यंत्रणेने 60 लाख रुपये रोख, एक किलो सोने, 1.25 किलो चांदी आणि 61 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी सीबीआयने न्यायालयाच्या आदेशानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये गुन्हा दाखल केला होता.
बेकायदेशीर खाण प्रकरणात छापेमारी
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या सुमारे दोन आठवडे आधी सीबीआयने 1200 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर खाण प्रकरणात झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील 16 ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये झारखंडमधील साहिबगंज, पाकूर आणि राजमहल या तीन जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. याशिवाय कोलकाता आणि पाटणा येथेही पथकाने तपास केला. एएनआयच्या म्हणण्यानुसार, सीबीआयने छापेमारीत वेगवेगळ्या ठिकाणांहून 60 लाख रुपये रोख, एक किलो सोने आणि 1.25 किलो चांदी जप्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या