एक्स्प्लोर

Bachchu Kadu : ... तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही; बच्चू कडू यांची मोठी घोषणा

Amravati News : कोण म्हणतंय आपण महायुतीमध्ये आहे असा प्रश्न विचारत आपण महायुतीमध्ये नसल्याचं आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. 

अमरावती : शेतकरी आणि दिव्यांगांसबंधी आपल्या काही मागण्या आहेत, त्या जर सरकारने पूर्ण केल्या तर मी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतो असं वक्तव्य प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलं. आपण महायुतीत नसून वेळ पडली तर शेतकरी , मजूर आणि कष्टकऱ्यांची आघाडी करून आपण निवडणूक लढवू असंही ते म्हणाले. 19 तारखेला राज्य सरकारला आमच्या मागण्याचे निवेदन देणार असल्याचं ते म्हणाले.

आगामी निवडणूक महायुतीतून लढवणार का असा प्रश्न विचारल्यानंतर आमदार बच्चू कडू म्हणाले की, कोण म्हणतंय मी महायुतीमध्ये आहे? आपण महायुतीमध्ये नाही. वेळ पडली तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू.. 

शेतकरी आणि दिव्यांगांच्या संबंधित मागण्यासंदर्भात बच्चू कडू हे राज्य सरकारला 19 जुलै रोजी निवेदन देणार आहेत. त्यामधील मागण्या जर सरकारने मान्य केल्या तर आपण निवडणूक लढवणार नाही असं बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. मी जागा सोडल्यावर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यायची त्यांनी द्यावी असंही ते म्हणाले. 

काय आहेत बच्चू कडूंच्या मागण्या? 

  • पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोजगार हमीमधून करावी. 
  • 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना भाव द्यावा. 
  • दिव्यांगाना 6 हजार रुपये प्रति महिना द्यावा. 
  • गरीब आणि श्रीमंतांमधील विषमता वाढत चालली आहे. त्यात समता आणावी. शेतमजू आणि कलेक्टरचा मुलगा एकाच शाळेत शिकावा अशी समता सरकारने आणावी. 

तिसऱ्या आघाडीचे संकेत

आमदार बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत. आपण महायुतीत नसून शेतकरी, मजुर, दलित, आदिवासी, वंचितांना घेऊन आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवू असं बच्चू कडू  म्हणाले. आमचीही तिसरी आघाडी नसून पहिली आघाडी असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaOne Nation One Election : एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Embed widget